रोमेश चंद्रा (३० मार्च, १९१९ - ४ जुलै, २०१६) हा भारतीय कम्युनिस्ट पक्षाचा नेता होता. भाकपचा विद्यार्थी नेता म्हणुन १९३९ नंतर त्याने भारतीय स्वतंत्र्य लढ्यामध्ये भाग घेतला. त्याने पक्षात अनेक पदे सांभाळली. तो १९७७ साली जागतिक शांती परिषदेचा अध्यक्ष झाला.

रोमेश चंद्रा
Bundesarchiv Bild 183-1982-0121-028, Erich Honecker und Romesh Chandra.jpg
जन्म

३० मार्च १९१९
लयालपूर, ब्रिटीश भारत

(आता फैसलाबाद, पाकिस्तान)
मृत्यू ४ जुलै २०१६ (वय ९७)
मुंबई, महाराष्ट्र, भारत
राष्ट्रीयत्व भारतीय
ख्याती

भारतीय कम्युनिस्ट

जागतीक शांतता परिषदेचे अध्यक्श

जीवनसंपादन करा

चंद्राचा जन्म ३० मार्च १९१९ला लयालपूर, ब्रिटीश भारत (आता फैसलाबाद, पाकिस्तान) येथे झाला. त्याने एक पदवी लाहौर येथुन तर एक कँब्रिज विद्यापीठ, येथुन मिळवली.

लाहोरात असताना, १९३४ - १९४१ पर्यंत चंद्रा हा एका विद्यार्थी संघटनेचा अध्यक्श होता. त्याने १९३९ साली भाकपचे सदस्यत्व स्विकारले, व भारतीय स्वतंत्र्ता लढ्यात भाग घेतला. १९५२ साली तो भाकपच्या केंद्रीय समितीचा सदस्य झाला. नंतर तो राष्ट्रीय परिषदेत १९५८ साली सामील झाला, व केंद्रीय कार्यकारी समितीचाही भाग झाला. १९६३ - १९६७ पर्यंत तो राष्ट्रीय परिषदेत मध्यवर्ती सचिवालयाचा सदस्य होता. त्याने पक्शाच्या 'निऊ एज' ह्या प्रकाशणाचे संपादक म्हणुन १९६३ - १९६६ ह्या काळात काम केले.

१९५२ - १९६३ मध्ये चंद्राने अखिल भारतीय शांती परिषदेचे सरचिटणीस म्हणुन काम केले. १९५३ मध्ये त्याने जागतिक शांती परिषदेत भाग घेतला, व १९५३ लाच त्याचा सरचिटणीस, तर १९७७ मध्ये त्याचा अध्यक्श झाला. त्याने संयुक्त राष्ट्राच्या संमेलनांमध्ये, भारताकडुन सर्वाधिक वेळा अभिभाषण केले. जागतिक शांती परिषदेने त्याला एफ. जोलियाॅट-क्युरी सुवर्ण शांती पदकाने १९६४ पुरस्क्रुत केले. १९६८ मध्ये सोवियेत युनियनने त्याला 'जागतिक लेनिन बक्शिस' ने सम्मानीत केले, व पुन्हा १९७५ साली त्याला 'आॅर्डर आॅफ फ्रेंडशिप आॅफ पिपल्स' ने सम्मानीत केले. १९७१ मध्ये त्याने 'उत्तर अटलांटिक करार संघटना' हिची टिका केली, व त्याला 'जागतिक शांततेवर भव्य धोका' असे म्हटले. २००० साली एॅथेन्स येथे झालेल्या जागतिक शांती परिषदेत चंद्राची 'प्रेसिडेंट आॅफ आॅनर' म्हणुन निवडणुक झाली.

चंद्रा विवाहीत होता व त्याला एक मुलगा, फिरोझ चंद्रा, होता. त्याचा पत्नीशी घटस्फोट झाला होता. त्याच्या पूर्व पत्नीचा म्रुत्यु २०१५ साली झाला. ४ जुलै २०१६ ला, मुंबईला दुपारी ३ च्या दरम्यान वय ९७ असताना चंद्राचा म्रुत्यु झाला.

ग्रंथसूचीसंपादन करा

  • Trahair, Richard C.S.; et al. (2013), "World Peace Council", Encyclopedia of Cold War Espionage, Spies, and Secret Operations, Enigma Books, p. 429, ISBN 9781936274260.
  • Windmiller, Marshall; et al. (1959), Communism in India, Berkeley: University of California Press