रोमियो अँड ज्युलियेट

(रोमिओ आणि ज्युलियेट या पानावरून पुनर्निर्देशित)

रोमियो आणि ज्युलियेट ही विल्यम शेक्सपियरने लिहिलेली एक जगप्रसिद्ध शोकांतिका आहे. या नाटकाची मराठीत अनेक भाषांतरे आणि रूपांतरे झाली. त्यांतली काही ही, आणि त्यांचे लेखक असे:

  • संगीत तारा विलास (१९०४) (दत्तात्रेय अ. केसकर)
  • प्रतापराव आणि मंजुळा (१८८२) (एकनाथ वि. मुसळे)
  • प्रेमाचा कळस किंवा रोमिओ ज्युलिएट (१९०८) (खंडेराव भि. बेलसरे)
  • मोहन तारा (१९०८) (के.रा.छापखाने)
  • रोमिओ अँड ज्युलिएट (के.ज.पुरोहित)
  • रोमिओ ज्युलिएट (१९०८) (खंडेराव भि. बेलसरे)
  • रोमिओ और ज्युलियेट-हिंदी (१९६३) (सादरकर्ते उत्पल दत्त)
  • रोमिओ और ज्युलियेट -हिंदी (सादरकर्ते लिटिल थिएटर ग्रुप)
  • रोमिओ ज्युलिएट (रमेश मोरे)
  • शशिकला आणि रत्‍नपाल (नारायण कानिटकर)
  • संगीत शालिनी (१९०१) (के.वि.करमरकर)

रोमिओ ज्युलिएट - हिंदी चित्रपट

१. निर्माता संजय लीला भन्साळी

२. निर्माती हेमा मालिनी

३. निर्माते दरबार ड्रीम्स

४. निर्माते (?); संगीत दिग्दर्शक खय्याम

पुस्तके वगैरे :

१.रोमिओ आणि ज्यूलिएट (मराठी गद्य कादंबरी - मंगेश पाडगावकर)

२. कथारूप शेक्सपियर (मराठी कथासंग्रह - प्रभाकर देशपांडे-साखरेकर)

४. शेक्सपियरच्या नाट्यकथा (रमेश मुधोळकर)

५.शेक्सपीअरची शोकनाट्ये (परशुराम देशपांडे)

६.शेक्सपीअरच्या प्रेमव्यथा (विजय पाठारे)

७. रोमिओ ज्युलिएट (नृत्यनाट्य- बिरजू महाराज)

फ्रांसिस्को हायेजने १८२३ साली काढलेले रोमिओ आणि ज्युलियेटचे चित्र