रॉसेल द्वीप प्रशांत महासागरातील पापुआ न्यू गिनी देशाच्या मिल्ने बे प्रांतातील ज्वालामुखीजन्य बेट आहे. हे बेट लुईझिएड द्वीपसमूहातील सगळ्यात पूर्वेकडचे बेट आहे. २६२.५ किमी क्षेत्रफळाच्या या बेटावर वस्ती तुरळक आहे. १९७८ च्या अंदाजानुसार येथे ३,००० व्यक्ती राहतात. पैकी बहुतांश व्यक्ती पूर्व किनाऱ्यावरील जिंजो गावात राहतात आणि येली दन्ये भाषा बोलतात. या भाषेतील या बेटाचे नाव येला आहे.

पापुआ न्यू गिनीचा ध्वज
येला बेट नकाशावर

या बेटावर घनदाट जंगल असून पर्जन्यमान खूप आहे.