रँडम ऍक्सेस मेमरी अर्थात रॅम हा संगणकाचा माहिती साठवण्याचा एक भाग आहे.[१] हा भाग संगणकामध्ये स्मृती सारखा काम करतो. रॅंडम एकसेस म्हणजे साठवलेली माहिती कोणत्याही क्रमाशिवाय संगणकाला वापरण्यासाठी उपलब्ध होते. रॅमला पुरवण्यात येणारी उर्जा खंडित केल्यास रॅमवर साठवलेली सर्व माहिती नष्ट होते.याविपरीत हार्ड-डिस्क्, कॉम्पॅक्ट् डिस्क् (CD), डि. व्हि. डि. (DVD) मधील माहिती ऊर्जा खंडित केल्यानंतर मिटवली जात नाही.

रॅमचे प्रकार संपादन करा

रॅमचे मुख्यता दोन प्रकार आहेत जे म्हणजे स्टॅटिक रॅम आणि डायनॅमिक रॅम. स्टॅटिक रामचा उपयोग कॅचे मेमरी म्हणून होतो तर डायनामिक रॅमचा उपयोग वेगवेगळे प्रोग्राम संगणकामध्ये चालवण्यासाठी होतो.

संदर्भ संपादन करा

  1. ^ Agricoss, Oleh (14 नोव्हेंबर 2021). "रॅम म्हणजे काय | रॅम चे प्रकार". Techmiss ब्लॉग.