रुपेश तळासकर
रुपेश तळासकर ( ३ जून १९८४)Rupesh Talaskar रुपेश तळासकर (३ जून १९८४) एक नावाजलेले मराठी भाषेतील कवी, लेखक, चित्रकार आहेत. यांचा जन्म तीन जून एकोणीशे चौर्याएनशी रोजी पुण्यात विश्रांतवाडी येथे झाला. त्यांनी डिजिटल आर्ट फाऊनडेशन ग्रुप ऑफ इंडिया [१] ही चळवळ सुरू केली..[२]
रुपेश तळासकर | |
जन्म | ३ जून १९८४ पुणे , भारत |
राष्ट्रीयत्व | भारतीय |
कार्यक्षेत्र | चित्रकला, संकल्प चित्रकला, स्टोरी बोर्ड |
प्रशिक्षण | एल.एस. रहेजा स्कुल ऑफ आर्ट (२००५) |
चळवळ | डिजिटल आर्ट फाऊनडेशन ग्रुप ऑफ इंडिया |
पत्नी | रुतू |
[ब्लॉग संकेतस्थळ] |
---|
प्रारंभिक जीवन आणि शिक्षण
संपादन'एक नावाजलेले मराठी चित्रकार, यांचा जन्म तीन जून एकोणीशे चौर्याएनशी रोजी पुण्यात विश्रांतवाडी येथे झाला. त्यांनी डिजिटल आर्ट फाऊनडेशन ग्रुप ऑफ इंडिया [१] ही चळवळ सुरू केली..पुढे आपले माध्यमिक शिक्षण त्यांनी बालमोहन विद्या मंदिर येथून पूर्ण केल. व जी. डी. आर्टच्या शिक्षणाकरिता एल.एस. रहेजा स्कुल ऑफ आर्ट येथे प्रवेश घेतला, तिथून जी. डी. आर्टच्या शेवटच्या परीक्षेत महाराष्टातून प्रथम येण्याचा मान पटकावला व लगेचच आपल्या व्यावसाईक कारागिर्दीला सुरुवात केली.[२]
व्यवसाय
संपादनआधुनिक चित्रपटाच्या माध्यमात काम करत असताना संकल्प चित्रकला, स्टोरी बोर्ड या सारख्या क्षेत्रात आपला ठसा उमटवला.
काही महत्त्वाच्या कृती
संपादन- (२०१० ) कुंभ-करण (TV सिरीयल कार्टून नेटवर्क ) कला दिग्दर्शक
- (२००९ ) म्युझिक विडिओ " Lady Ice" Rock band Duran Duran. - कला दिग्दर्शक
- (२०१२) "[३] "बॉलीवूड चित्रपट स्टोरी बोर्ड
वैयक्तिक जीवन
संपादन- रुतू तळासकर ह्या रुपेश तळासकर यांच्या पत्नी असून,रुपेश तळासकर सह कुटुंब आपल्या आई वडिलांसह वरळी येथे राहतात.[४]
कविता संग्रह
संपादन- सेल्फ पोट्रेट(2012)
- सेल्फ पोट्रेट : दिसणं संपत तिथ असणं सुरू होत,असणं संपत तिथ नसणं सुरू होत, जे नाहीच आहे त्या बधल बोलण्यात काय अर्थ आहे ..आणि जे आहे ते इतके ठसठशीत आहे कि ते सांगण्यास शब्द अपुरेच आहेत ,म्हणून जे आहे ते सांगण्यासाठी मानवाला कलेची गरज पडली असावी ,अशा ठसठशीत सत्या साठी कलाकाराने राग गायले असावेत ,चित्र रेखाटली असावीत ,रंग भरले असावेत ,शिल्प बनवली असावीत ,नाच ही असाच जन्माला आला असावा ,ती प्रत्येक गोष्ट जी मनाला मोहते तिची निर्मिती ही अशाच अज्ञात सत्याने जन्माला घातली असावी . किती सोपं होत निसर्गाबरोबर लहानाचे मोठे होणे ..पण आपण आपल्या दृष्टीला भिंती घालून घर बनवण्याचा प्रयत्न केला ...या विराट नैसर्गिक मनाला चार भिंती थोपू शकतात असा विचार केला ,सत्याशी तोडून स्वताला एकना अनेक नात्यांनी ,कारणांनी ,गरजांनी आपण स्वताला कोंडून घेण्याचा प्रयत्न केला ,कुणा पासून पळण्याचा हा प्रयत्न? ,असण्यापासून कि नसण्यापासून ? कलावंत नेहमी प्रयत्न करत राहिला सगळ्यांना सत्याचा चेहरा दाखवण्याचा ..पण दैवदुर्विलास नसण्याच्या प्रेमात पडलेली ही नजर असण्याला भुलणार कशी ? मग सुरू झाला वैश्विक रोमांटिक प्रेम सोहळा ....ज्याचा साठी तुडवला गेला अंगणात पडलेला चाफा ,सोनेरी किरणांच्या पहाटे ऐवजी अंगात भरू लागल्या रात्रीचा डिस्को लेझर ,कस अस विसकटल गेलं रान आपल्याच युगात ? म्हणूनच फिस्कटायला लागले असावेत रंग माझ्या कॅनवास वर पण लोकांना ते ही आवडले ....... जेंव्हा सत्य मांडले लोकांसमोर तेंव्हा त्याचा तमाशा झाला आणि तमाशा केला तेंव्हा लोक ओ हो ! ओ हो ! म्हणाले ..... हाहाहाहाहाहाहाहाहाहाहाहाहाहाहाहाहाहाहाहाहाहाहाहाहाहाहा हाहाहाहाहाहाहाहाहाहाहाहाहाहाहाहाहा
- कारण तू माझ चित्र आहेस !
रंगांना स्पर्शत नाहीत कॅनवासचे कोरडे हात .. पापण्यांना झेपत नाही तुझ्याकडे जाणारी वाट . अधांतरीत लटकत्यात रस्त्या रस्त्यांवर कटलेल्या पेन्सिली ... तुटलेल्या टोकि ,झिजलेले रबर, पुसलेल्या पाट्या. अजूनही वाट बघतायत, खुर्च्या...विटांच्या भिंती , एझल्स ,गझल्स..... रंगांना धुण्यासाठी घेतलेले पाणी अजूनही तसंच आहे ..गढूळ होऊन शुद्ध झालंय... दूर दूर चालोय मी ह्या शहरातून ... जिथे रंगांचा वास येत नाही.. मानस पोज देत नाहीत.. शब्दकोड सोडवायलासुद्धा पेन्सील मिळत नाही . जिथे कुठल्याच जुन्या आठवणी पावसा सारख्या शिरत नाहीत ..... मन सैरा वैरा पळत नाही..भास होत नाहीत , राग येत नाही,प्रेम सुधा होत नाही... तुझा चेहराही विसरून गेलोय मी, पण खात्री आहे तू भेटल्यावर मी ओळखीन तुला ...कुठल्याही जन्मात..कधीही ...
कारण तू माझ चित्र आहेस !
पुरस्कार
संपादन- महाराष्ट्र शासन पुरस्कार २००५. जी. डी. आर्टच्या शेवटच्या परीक्षेत महाराष्टातून प्रथम येण्याचा मान.[५]
संदर्भ
संपादनबाह्य दुवे
संपादन- ब्लॉग
- स्केचबुक Archived 2014-03-13 at the Wayback Machine.
- लाईफ ड्रॉइंग
- सि. जी. सोसायटी Archived 2016-01-30 at the Wayback Machine.
- डेविअन आर्ट
- सि.जी. तंत्र Archived 2013-01-16 at the Wayback Machine.
- कोरफ्लोट Archived 2008-06-05 at the Wayback Machine.
- सि.जी.. अरीना
- सि.जी. हब
- बझ Archived 2014-03-14 at the Wayback Machine.
- कॉलेज वर्क