रीइन्व्हेंटिंग रेव्होल्युशन

रीइन्व्हेंटिंग रेव्होल्युशन हे गेल ऑमवेट यांनी लिहलेले आणि १९९३ मध्ये रुटलेज ने प्रकाशित केलेले पुस्तक आहे. भारतामधील नव्या सामाजिक चळवळींचा आणि समाजवादी परंपरा यांचा अभ्यास गेल आमवेट 'क्रांतीचा पुनर्शोध ' या पुस्तकामधून करतात . राष्ट्रीय चळवळी मधून समाजवादी विचारांची सुरुवात स्वतंत्र भारतामध्ये कशा पद्धतीने सुरू झाली याचा आढावा घेताना गेल आमवेट ह्या स्त्रियांची चळवळ ,जाती विरोधी चळवळ ,पर्यावरणवादी चळवळी आणि शेतकऱ्यांचा संघर्ष ह्या सर्व वादविवादांचे चर्चाव्यूह या पुस्तकामधून मांडत जातात . साधारणपणे त्या चार विभागामध्ये पुस्तकाची मांडणी करतात .

विभागनिहाय ठळक मुद्दे

संपादन

पहिल्या भागामधून या सर्व चळवळीची पार्श्वभूमी मांडत जातात तर दुसऱ्या भागामधून त्यांनी प्रत्यक्ष या चळवळीचा उदय कशा प्रकारे होत गेला याचे वर्णन केलेले आहे. तिसऱ्या भागामध्ये कामगार वर्गाची चळवळ आणि पारंपरिक मार्क्सवाद यामधील संबंध स्पष्ट करतात . चौथ्या विभागामध्ये ग्रामीण स्त्रियांचा संघर्ष हा इ.स. १९८५ नंतर ते आतापर्यंतचा जो पर्यायी विकासाच्या पैलूवर निर्माण झाला होता तोच पुढे पर्यायी समाजवाद म्हणून निर्माण कसा होत गेला याविषयीची चर्चा करतात.

तत्कालीन राष्ट्रीय चळवळीचे विश्लेषण

संपादन

या पुस्तकामधून गेल आमवेट या राष्ट्रीय चळवळीकडे वेगळ्या दृष्टीकोनातून पाहताना दिसतात. प्रमुखप्रवाही राष्ट्रीय चळवळ देशभक्तीच्या प्रेरणेने उभारली होती या विचाराला खंडित करण्याचे काम यामधून समोर येते. 'स्वराज्य 'या विषयीची चिकित्सक मांडणी करताना त्या म्हणतात कि स्वराज राज हे ? कोणाचे राष्ट्रीय नेते कोण होते ? त्यांचा वर्गीय जातीय संबध कोणता ? या सर्व प्रश्नांचे विवेचन त्या देतात. म्हणजेच प्रमुखप्रवाही राष्ट्रीय चळवळीला त्या वर्गीय, जातीय अंगाने पाहून जे स्वराज्याचे मागणी करणारे होते तेच भांडवलदारी व्यवस्थेमधील भागीदार होते. त्यामुळे त्या कामगार शेतकरी यांचे राज्य का नाही याचे विस्तृतपणे विवेचन करून त्यामधून शेतकरी, कामगारांच्या क्रांत्या कशा उदयास आल्या ते स्वांतत्त्र्यानंतर उदयास आलेल्या नक्सलवादी चळवळीच्या अभ्यासामधून दाखवून देतात .

स्वतंत्र भारताची निर्मिती ही नेहरू युगामध्ये विकासाच्या मुद्द्यावर उभी राहताना तो औद्योगिकीकरण, तंत्रज्ञानाचा विकास असेल याची पायाभरणी ही समाजवादी राज्यव्यवस्थे वर उभी राहिली. ज्यामध्ये राज्याने लोकशाही मुल्यावरती, कल्याणकारी धोरणाभोवती उभी राहण्याची भूमिका घेतली असे असले तरी खऱ्या अर्थाने शेतकरी,आदिवासी यांचे प्रश्न अनुत्तरीत राहिले होते. त्यातूनच मग माओवादी क्रांतिकारी विचाराच्या भोवती नक्सलवादी ही नवी चळवळ उभी राहिली ज्यात पुढे आदिवासी, भूमिहीन, शेतकरी, कामगार इ.चा समावेश येत गेला.

महाराष्ट्रातील नव्या जातीविरोधी चळवळी

संपादन

पारंपारिक मार्क्सवादाला खऱ्या अर्थाने छेद देण्याचे काम या चळवळीने केलेले होते. महाराष्ट्रामध्ये दलित पॅंथरच्या निर्मितीमधून नव्या जातीविरोधी चळवळीची सुरुवात झाली तर बिहारमध्ये जातीविरोधामधून वर्गीय चळवळ उभी राहत गेली . या दोन्ही चळवळी ह्या इ.स. १९७० च्या दरम्यान आंबेडकरांच्या तत्त्वज्ञानामधून जातीविरोधी चळवळ तर मार्क्सच्या तत्त्वज्ञानामधून वर्गीय चळवळ उभी राहिलेली दिसून येते. वर्गीय कि जातीय या सर्व दंद्वामधून चळवळी कशा प्रकारे आकार घेत गेल्या याचा आढावा गेल घेत जातात.

याच काळात स्त्रियांच्या नव्या चळवळी ही शहरी/ग्रामीण भागामधून उदयास येत होत्या . याच दरम्यान मध्यम वर्गीय शहरी विद्वानाची भूमिका यामध्ये महत्त्वाची राहिलेली होती . स्त्री चळवळी मध्ये ग्रामीण गरीब शेतकरी महिला किंवा कामगार महिला यांची चळवळ आणि मध्यम वर्गीय बौद्धिक स्त्रिया यांच्या चर्चेच्या विमार्शामधून स्त्री चळवळीची घडवणूक होत होती . त्याच वेळी दलित चळवळ कशा प्रकारे स्त्रियांच्या प्रश्नांकडे दुर्लक्ष करत होती हे गेल सांगतानाच दलित स्त्रियांपुढे उभे राहिलेल्या जात, कुटुंब ,दलित चळवळी मधील आव्हाने यांना कशा प्रकारे सामोरे जावे लागत होते आणि हे करतानाच ब्राह्मणी संस्कृतीला छेद देण्याचा प्रयत्नही त्या दुसऱ्या बाजूने करत होत्या . या सर्व संघार्षामधून स्त्रियांना पितृसत्तेला अधिक धारदारपणे आव्हान देणे सोपे होत गेले असे गेल आपल्या पुस्तकामधून मांडत जातात .

स्त्री चळवळीचे बदलते स्वरूप

संपादन

इ.स. १९७५ नंतर स्त्री चळवळीने जहालवादी भूमिका सांस्कृतिकतेच्या भोवती उभी केली जी स्वातंत्र्य पूर्व चळवळीतील स्त्रियांनी घेतलेली नव्हती. यासोबतच स्त्री चळवळीचा विकास अनेक प्रश्न हाताळत कसा होत गेला याविषयीची चर्चा हिंसा, स्वायत्त गट, पक्षाची स्वायत्त उभारणी इ. मुद्द्याला घेऊन अधिक विस्ताराने स्त्रियांच्या चळवळीचा विकसित होत होत्या ते गेल स्पष्ट करत जातात. .

शेतकरी चळवळ, पर्यावरणीय चळवळ यांची आव्हाने

संपादन

इ.स. १९७२ ते १९७५ च्या दरम्यान शेतकरी चळवळीने भारतीय राज्य व्यवस्थेला जोरदारपणे आव्हाने निर्माण केली होती. हे करतानाच पारंपरिक मार्क्सवादी विचारालाही प्रश्नांकित केले. पर्यावरण वादी चळवळ ह्या उत्तराखंडमधील मासेमारी व्यवसायामधील चळवळ असो या मधील संबध हे जात, वर्गीय दृष्टीकोनातून कसे मांडले गेले याचे विस्तृत विवेचन देतानाच गांधीवादी विचारधारा आणि मार्क्सवादी हे पर्यावरण चळवळीकडे कसे पाहत होते ते गेल दाखवून देतात. या सर्व चळवळी उभ्या राहिल्यानंतर त्या वेगवेगळ्या पर्यायी व्यवस्थेच्या शोधासाठीची धडपड कशा प्रकारे करत होते याचे चिकित्सक विश्लेषण करतात. शेवटच्या काही प्रकरणा मधून गेल मांडत जातात कि, नव्या पर्यायी विकासामध्ये आपले स्थान अधिकरीत्या स्पष्ट करता यावे यासाठीचा संघर्ष स्त्री चळवळ, पर्यावर्णीय चळवळ, जातीय चळवळ या कशा पद्धतीने करत होत्या ते लिखाण इथे येत जाते. शेवटी गेल मांडतात कि या नव्या चळवळी स्वतःला समाजवादी म्हणवून घेण्यापेक्षा क्रांतिकारी म्हणवून घेण्यास धन्यता मानू लागले होते. त्यांनी इतिहासाचा पुनर्शोध घेत आपली पुनर्रमांडणी केली आणि स्वतःला व्यवस्थेच्या विरोधात संघर्ष करणारे म्हणून ते पाहत असत. त्यातूनच त्यांनी वर्गविहीन, पितृसत्ताविहीन, जातीविरहित चिरस्थायी समाज निर्माण करण्याचा प्रयत्न क्रांतीच्या पुर्नशोधातून कशा प्रकारे केला ते गेल आमवेट स्पष्ट करताना या पुस्तकातून दिसतात.

संदर्भ

संपादन
  1. ^ चुका उधृत करा: <ref> चुकीचा कोड; :0 नावाने दिलेल्या संदर्भांमध्ये काहीही माहिती नाही