राहुल उत्तमराव ढिकले

राहुल उत्तमराव ढिकले हे एक भारतीय राजकारणी आणि महाराष्ट्राच्या १४ व्या विधानसभेचे सदस्य असून ते नाशिक पूर्व विधानसभा मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करतात. भारतीय जनता पक्षाचे ते सदस्य आहेत.[][]

राहुल उत्तमराव ढिकले

मतदारसंघ नाशिक पूर्व
विद्यमान
पदग्रहण
२३ ऑक्टोबर २०१९

जन्म १४ ऑगस्ट, १९७९ (1979-08-14) (वय: ४५)
नाशिक
राष्ट्रीयत्व भारतीय
राजकीय पक्ष भारतीय जनता पक्ष
वडील उत्तमराव ढिकले
निवास ढिकले नगर, पंचवटी, नाशिक

जीवन परिचय

संपादन

ढिकले यांचा जन्म १४ ऑगस्ट १९७९ रोजी नाशिक येथे झाला. राहुल ढिकले यांचे वडील स्वर्गीय उत्तमराव ढिकले हे नाशिक लोकसभेचे माजी खासदार तसेच नाशिक पूर्व मतदार संघाचे आमदार राहिले होते.[][]राहुल ढिकले यांनी वयाच्या १२ व्या वर्षांपासून कुस्तीचे प्रक्षिक्षण घेतले असून शालेय जीवनात अनेक कुस्ती स्पर्धांमध्ये सहभाग घेतला आहे. महाराष्ट्र केसरी, हिंद केसरी स्पर्धेमध्ये त्यांनी सहभाग घेतला होता. १९९५ साली त्यांनी नाशिक महापौर केसरी स्पर्धा जिंकली.[]

शैक्षणिक पात्रता

संपादन

राहुल ढिकले यांनी N.B.T. Law कॉलेज नाशिक मधून कायद्याचे शिक्षण पूर्ण केले आहे.

राजकीय प्रवास

संपादन
  • २०१२ नाशिक महानगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीत राहुल ढिकले हे नगरसेवक म्हणून निवडून आले.
  • २०१४-१५ साली ते नाशिक महानगरपालिकेच्या स्थायी समितेचे अध्यक्ष होते.[]
  • २०१९ साली नाशिक पूर्व मतदार संघातून आमदार म्हणून निवडून आले.[]

संदर्भ

संपादन
  1. ^ "Rahul Uattamrao Dhikle(Bharatiya Janata Party(BJP)):Constituency- NASHIK EAST(NASHIK) - Affidavit Information of Candidate:". myneta.info. 2023-02-16 रोजी पाहिले.
  2. ^ "Nashik East (Maharashtra) Assembly Election Results 2022: Candidate List, Winner, Runner-Up, Latest News and Updates, Videos , Photos". The Indian Express (इंग्रजी भाषेत). 2023-02-16 रोजी पाहिले.
  3. ^ author/admin (2015-04-08). "उत्तमराव ढिकले यांचे निधन". Lokmat. 2023-02-16 रोजी पाहिले.
  4. ^ "उत्तमराव ढिकले यांचे निधन". Maharashtra Times. 2023-02-16 रोजी पाहिले.
  5. ^ देवगिरे, संपत. "आमदार पै.राहुल ढिकलेंचा दिवस सुरू होतो तासभर धावल्यानंतर !". Sarkarnama. 2023-02-16 रोजी पाहिले.
  6. ^ "नाशिक महापालिकेत मनसेचे भाजपला धोबीपछाड; स्थायीच्या अध्यक्षपदी ढिकले". Loksatta. 2023-02-17 रोजी पाहिले.
  7. ^ "Rahul Uattamrao Dhikle-rahul Uattamrao Dhikle Bjp Candidate Nashik East Election Result 2019". Amar Ujala (हिंदी भाषेत). 2023-02-17 रोजी पाहिले.