राष्ट्रीय राजकीय पक्ष
राष्ट्रीय पातळीवर कार्यरत असणाऱ्या राजकीय पक्षांना राष्ट्रीय पक्ष असे म्हणतात. राष्ट्रीय पक्ष म्हणून मान्यता मिळवण्यासाठी निवडणूक आयोगाने खालील निकष ठरवले आहेत.[१][२][३][४]
- किमान चार राज्यांमध्ये शेवटच्या लोकसभा निवडणुकीत किंवा विधानसभेच्या निवडणुकीत किमान ६ टक्के मते मिळणे आवश्यक किंवा किमान चार सभासद लोकसभेत निवडून येणे अपेक्षित आहे.
- आधीच्या लोकसभेच्या निवडणुकीत किमान तीन राज्यांमध्ये मिळून लोकसभेच्या एकूण जागांपैकी २ टक्के जागा निवडून येणे आवश्यक असते.
- किमान चार राज्यांमध्ये राज्यपातळीवरील पक्ष म्हणून मान्यता मिळणे आवश्यक आहे.