राल्फ ॲबरक्रॉम्बी
सर राल्फ ॲबरक्रॉम्बी (७ ऑक्टोबर, १७३४:मेन्स्ट्री, क्लॅकमॅनशायर, स्कॉटलंड - २८ मार्च, १८०१:अलेक्झांड्रिया, इजिप्त) हा स्कॉटिश सेनाधिकारी आणि राजकारणी होता. हा ब्रिटिश सैन्यात लेफ्टनंट जनरल पदावर तसेच आयर्लंडचा सर्वोच्च सेनापती होता.
हा क्लॅकमॅनशायरमधून दोनवेळा युनायटेड किंग्डमच्या संसदेत निवडून गेला होता. हा काही दिवसांकरता त्रिनिदादमधील यु.के.चा पहिला गव्हर्नर होता.
याने २१ मार्च, १९०१ रोजी अलेक्झांड्रियाच्या लढाईत फ्रेंच सैन्याला हरविले. त्यात तो जखमी झाला आणि तेथेच त्याचा मृत्यू झाला.