राय हे गेर नृत्यातील नर्तक असतात. त्यांचा पेहरावात दोन ९ वारी साड्यांचे केलेले उपरणे असते. कंबरेखाली एक साडी गोलाकार गुंडाळलेली असते. नर्तकांच्या हातात तलवार व डोक्यावर रंगीत पागोटे असते. यांच्या सोबत साडी नेसलेले स्त्री वेषातील पुरुष असतात. या सर्वांना गेरनृत्यातील शिस्त चोखपणे पाळावी लागतात. हत्यारबंद असलेल्या रायांचे गेरनृत्य पाहण्यास मनमोहक असते.