रामकुंड

(राम कुंड या पानावरून पुनर्निर्देशित)

रामकुंड हे पवित्र ठिकाण गोदावरी नदीच्या पात्रात नाशिक येथे आहे. येथे स्नान करण्याने पुण्य मिळते असे मानले जाते.राम कुंड हे गोदावरी नदीवरील एक महत्त्वाचे धार्मिक कुंड आहे. हिंदू धर्मीय या कुंडास अतिशय पवित्र जागा मानतात.हिंदू धर्मानुसार येथे जर स्नान केले तर माणसास पापमुक्ती प्राप्त होते. समुद्रमंथनाच्या वेळी अमृत कलशातुन अमृताचे काही थेंब येथे पडले आणि राम कुंड पवित्र झाले अशी एक आख्यायिका आहे.हिंदू धर्मीय येथे अस्थी विसर्जन करण्यासाठी येतात. येथे जर आपल्या पुर्वजांच्या अस्थीचे विसर्जन केले तर त्या अस्थी पाण्यात विरघळतात आणि मृतत्म्यास मोक्ष मिळतो असा समज हिंदू धर्मीयांत आहे. येथे जवळच गंगा गोदावरीचे मंदिर आहे. दर बारा वर्षांनी येथे सिंहस्थ कुंभमेळा[] पार पाडतो. कुंभमेळ्याच्या वेळी लाखो हिंदू धर्मीय येथे जमतात आणि स्नान करून पुण्यप्राप्ती मिळवतात.यावेळी अनेक साधु संत उपस्थिती लावतात. रामकुंडाच्या जवळच सीता कुंड आणि लक्ष्मण कुंड आहे. राम कुंडाचा रामायणातही उल्लेख आहे.

नाशिकमधील रामकुंड