रामभाऊ म्हाळगी

भारतीय राजकारणी

रामचंद्र काशीनाथ म्हाळगी ऊर्फ रामभाऊ म्हाळगी (जन्म : इ.स.१९२१; - इ.स. १९८२) हे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रचारक, जनसंघ या राजकीय पक्षाचे महाराष्ट्राचे पहिले सरचिटणीस आणि पक्षाचे विधानसभेतील पहिले आमदार होते. ते भारतीय जनता पक्षाचे महाराष्ट्राचे पहिले प्रदेशाध्यक्ष होते. जनता पार्टीचे खासदार म्हणून १९७७ साली व १९८० साली ते ठाणे लोकसभा मतदार संघातून निवडून गेले होते.

रामभाऊ म्हाळगी यांचा पुतळा, रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनी, उत्तन, मुंबई

पुण्यात एक रामभाऊ म्हाळगी फाऊंडेशन आहे. ते एक प्राथमिक शाळा चालवते. मुंबईतील उत्तन येथे त्यांच्या स्मृत्यर्थ रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनी स्थापन झाली आहे.