रामफळ (इंग्रजीत: Bullock's Heart, सामान्य नाव: Custard Apple; शास्त्रीय नाव : Annona reticulata/ अ‍नोना रेटिक्युलाटा) हे एक मध्यम उंचीचे वृक्ष असून या झाडाची पाने पेरूच्या पानांसारखी असतात. हे झाड कमी प्रमाणात आढळते. रामफळ हे एक गोड फळ असून उन्हाळ्यात रामनवमी दरम्यान येत असते. फळाचे आवरण तपकिरी, केशरी रंगाचे असते. रामफळ हे सिताफळाच्याच जातीचे असते.

महाराष्ट्रातील गोदरी (ता. चिखली, जि. बुलढाणा) गावातील रामफळ
रामफळ व पाने


खायला अतिशय चवदार आणि दिसायला आकर्षक असलेल्या रामफळाची रामजन्माच्या वेळी म्हणजे रामनवमीच्या सुमारास पिकायला सुरुवात होते.

रामफळाचे उत्पादन

संपादन
 
महाराष्ट्रातील गोदरी (ता. चिखली, जि. बुलढाणा) गावातील रामफळ

सरासरी ७ वर्षाच्या एका झाडापासून वर्षाला १००-१५० फळे उत्पादन मिळते. उत्पादन झाडांच्या जातीमुळे कमी अधिक होतें.

बाह्य दुवे

संपादन
 
विकिमीडिया कॉमन्सवर संबंधित संचिका आहेत