पेरु (फळ)
पेरू एक आंबट-गोड फळ आहे. याची झाडे विषुववृत्तीय व उष्ण हवामान असलेल्या भागात वाढतात. हे आतून पांढरे अथवा लालसर असते.कच्चा पेरू वरून हिरवा तर पिकल्यावर पिवळ्या रंगाचा असते. नंतर गर बियाळ असतो व चव गोड असते. पेरू अनेक पक्ष्यांचे ही खाद्य आहे. याचे शास्त्रीय नाव सिडियम ग्वाजाव्हा असे आहे. इंग्रजी मध्ये पेरूला guava म्हणतात.तर हिंदीत अमरुद, जाम या नावाने ओळखले जाते.कच्चा पेरू कडक तर पिकल्यावर मऊ होते.
हा लेख/विभाग स्वत:च्या शब्दात विस्तार करण्यास मदत करा. |
खूप वर्षांपूर्वी पोर्तुगिजांनी दक्षिण अमेरिकेतून हे फळ भारतात आणले. सध्या भारतभर पेरूची मोठ्या प्रमाणात लागवड होते. यास "जाम' किंवा "अमरूद' असेही संबोधले जाते. आवळ्याच्या खालोखाल भरपूर "क' जीवनसत्त्व देणारे हे फळ असून, पावसाळ्याच्या व थंडीच्या दिवसांत निरनिराळ्या "व्हायरस'पासून संरक्षण मिळवून देणारे आहे. आंबट खाल्ले की सर्दी-खोकला होतो, असा एक खूप मोठा गैरसमज जनमानसात रुजलेला आढळतो. त्यामुळे सामान्यतः मुलांना चिंच, आवळा, पेरू यापासून दूर ठेवण्याकडे कल असतो. शेकडो माणसात एखाद्याला आंबट पदार्थ सहन होत नाही व त्याचा त्रास होतो. परंतु म्हणून सर्वांनाच या पौष्टिक फळांपासून वंचित करणे अयोग्य आहे. नियमित पेरू खाणाऱ्या लोकांमध्ये लोहाची कमतरता (anaemia) निर्माण होत नाही. कारण त्यातील "क' जीवनसत्त्व हे लोहाचे शोषण करण्यास मदत करते.
पेरू पासून आइसक्रीम व गोळ्या बनविल्या जातात.पेरूला इंग्रजी मध्ये guava असे म्हणतात.