रामचंद्र वीरप्पा
भारतीय राजकारणी
रामचंद्र वीरप्पा (इ.स. १९०८-जुलै १८, इ.स. २००४) हे भारतीय जनता पक्षाचे नेते होते. ते इ.स. १९६२ आणि इ.स. १९६७च्या लोकसभा निवडणुकांमध्ये काँग्रेस पक्षाचे उमेदवार म्हणून तर इ.स. १९९१,इ.स. १९९६,इ.स. १९९८,इ.स. १९९९ आणि इ.स. २००४च्या लोकसभा निवडणुकांमध्ये भारतीय जनता पक्षाचे उमेदवार म्हणून कर्नाटक राज्यातील बीदर लोकसभा मतदारसंघातून लोकसभेवर निवडून गेले.