रानवाटा
श्री.मारुती चितमपल्लींच्या 'रानवाटा' ह्या पुस्तकात 'अरणी नावाचे एक प्रकरण आहे. त्यात मुंगसाचा खूप छान प्रसंग लिहिला आहे. साप आणि मुंगूसाची मारामारी झाल्यावर मुंगूस त्याला असलेल्या उपजत माहितीने एक कंद उकरून खातं, आणि मग वूड्ससाहेब तो कंद श्री.गॅम्बल या वनस्पती शास्त्रज्ञाकडे संशोधनासाठी पाठवून देतो. त्या संशोधनात असं लक्षात येतं की तो कंद सापाच्या विषावर अगदी रामबाण औषध आहे. त्याचं नाव सर्पगंधा. हे रानवाटा पुस्तक फार छान आहे. ज्यांना मिळेल त्यांनी जरुर वाचावे. निसर्गातील अनेक अद्भुत गोष्टी अतिशय रंजक भाषेत लिहिल्या आहेत.