राधिका मर्चंट अंबाणी

राधिका मर्चंट अंबाणी (mr); Radhika Merchant Ambani (fr); Radhika Anant Merchant (ha); Radhika Merchant Ambani (en); رادھکا مرچنٹ انبانی (ur) businesswoman, trained classical dancer and daughter of business tycoons Viren and Shaila Merchant (en); businesswoman, trained classical dancer and daughter of business tycoons Viren and Shaila Merchant (en); danseuse indienne (fr) Radhika Nerchant, Radhika Merchant (en); Radhika Nerchant (fr)

राधिका मर्चंट अंबाणी (१८ डिसेंबर, १९९४:मुंबई, महाराष्ट्र, भारत - ) ही एक भारतीय उद्योगिनी आणि शास्त्रीय नृत्यांगना आहे. ही भारतातील सर्वात श्रीमंत अंबानी कुटुंबाची होणारी सून आहे..[][] ती एन्कोर हेल्थकेरॉ या औषध कंपनीच्या संचालकमंडळाचा भाग आहे. ही प्राणीकल्याण, नागरी हक्क, शिक्षण, आरोग्य, मानवी हक्क, आर्थिक सशक्तीकरण आणि सामाजिक अशा विविध परोपकारी प्रयत्नांमध्ये सक्रिय आहे.[]

राधिका मर्चंट अंबाणी 
businesswoman, trained classical dancer and daughter of business tycoons Viren and Shaila Merchant
माध्यमे अपभारण करा
  विकिपीडिया
जन्म तारीखडिसेंबर १८, इ.स. १९९४
मुंबई
नागरिकत्व
व्यवसाय
  • व्यावसायीक व्यक्ती
  • philanthropist
  • नर्तक / नर्तकी
वडील
  • विरेन मर्चंट
आई
  • शैला मर्चंट
वैवाहिक जोडीदार
अधिकार नियंत्रण
साचा:Translations:Template:Wikidata Infobox/i18n/msg-editlink-alttext/mr
Ahalin Ambani a Wani buki, 2018

प्रारंभिक जीवन आणि शिक्षण

संपादन

मर्चंट अंबाणीचा जन्म १८ डिसेंबर, १९९४ रोजी मुंबई, महाराष्ट्र येथे वीरेन आणि शैला मर्चंट या हिंदू गुजराती जोडप्याच्या पोटी झाला.[] तिचे वडील एन्कोर हेल्थकेर या औषध कंपनी-चे मालक आणि मुख्याधिकारी आहेत.[][]

मर्चंट अंबणीचे शिक्षण मुंबईच्या कॅथेड्रल, जॉन कॉनन स्कूल्स आणि इकोले मोंडियाल वर्ल्ड स्कूलमधून झाले. तिने बीडी सोमाणी इंटरनॅशनल स्कूलमधून आंतरराष्ट्रीय स्तरावरील पदविका घेतली. २०१७ मध्ये पदविका घेतल्यावर ती न्यू यॉर्क विद्यापीठात राजकारण आणि अर्थशास्त्राचा अभ्यास करण्यासाठी न्यू यॉर्कला गेली.[]

मर्चंट अंबाणी एक प्रशिक्षित शास्त्रीय नृत्यांगना आहे, तिने मुंबईतील श्री निभा आर्ट्स डान्स अकादमी येथे गुरू भावना ठक्कर यांच्या कडे भरतनाट्यम नृत्य प्रशिक्षण घेतलेले आहे. तिने जून २०२२ मध्ये 'जिओ वर्ल्ड सेंटर, मुंबई' येथे आरंगेत्रम केले.[][]

कारकीर्द

संपादन

मर्चंट अंबाणीने तिची कारकीर्द मुंबईतील सीडर कन्सल्टंट्समध्ये तीन महिन्यांच्या इंटर्नशिपसह सुरू केली. तिने जून ते ऑगस्ट २०१६या कालावधीत व्यवसाय धोरण सल्लागार म्हणून काम केले.[१०] नंतर तिने 'इंडिया फर्स्ट ऑर्गनायझेशन' आणि 'देसाई अँड दिवाणजी' यांच्यासह सल्लागार कंपन्यांमध्येही काम केले आहे. यानंतर, ती मुंबईस्थित स्थावर मालमत्ता कंपनी 'इसप्रवा'मध्ये कनिष्ठ विक्री व्यवस्थापक म्हणून रुजू झाली.[११][१२]

२०१७ मध्ये, मर्चंट अंबाणीला आपल्या कौटुंबिक व्यवसाय एन्कोर हेल्थकेरमध्ये निदेशक करून घेण्यात आले. याशिवाय ती परोपकारी उपक्रम आणि सामाजिक कार्यात सक्रियपणे भाग घेते.[१३] तसेच ती विविध ना-नफा संस्थांमध्ये आपले योगदान देत असते.[१४]

वैयक्तिक जीवन

संपादन

मर्चंट अंबाणीने रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेडचे व्यवस्थापकीय संचालक आणि अध्यक्ष मुकेश अंबाणी यांचा धाकटा मुलगा अनंत अंबानीशी लग्न ठरवले आहे.[१५] मार्च २०२४ मध्ये गुजरातच्या जामनगर शहरातील मोटी खावडी भागात त्यांचा विवाहपूर्व उत्सव झाला.[१६][१७]

संदर्भ

संपादन
  1. ^ "Did You Know: Radhika Merchant Is A Millionaire? Check A-Z About Future Ambani Bahu". Zee News (इंग्रजी भाषेत). 7 March 2024 रोजी पाहिले.
  2. ^ "who-is-radhika-merchant". business-standard.com. 7 March 2024 रोजी पाहिले.
  3. ^ "Who is Radhika Merchant? Know everything about Ambani family's new member". business-standard.com. 7 March 2024 रोजी पाहिले.
  4. ^ "Radhika Merchant Biography, Education, Professional Career, NET Worth - GMRIT". gmrit.org. 7 March 2024. 7 March 2024 रोजी पाहिले.
  5. ^ "Who are Radhika Merchant's parents? All about them". द टाइम्स ऑफ इंडिया. 7 March 2024. 7 March 2024 रोजी पाहिले.
  6. ^ "Meet Radhika Merchant's Billionaire Father Viren Merchant, Who Has Rs 750 Crore Net Worth". IndiaTimes (इंग्रजी भाषेत). 4 March 2024. 7 March 2024 रोजी पाहिले.
  7. ^ "Radhika Merchant Height, Age, Boyfriend, Husband, Family, Biography & More » StarsUnfolded". starsunfolded.com. 7 March 2024 रोजी पाहिले.
  8. ^ Gleeson, Cailey. "Who Is Radhika Merchant? The Businesswoman And Trained Classical Dancer Joining India's Richest Family". Forbes (इंग्रजी भाषेत). 7 March 2024 रोजी पाहिले.
  9. ^ "Who is Radhika Merchant, soon-to-be bride of Anant Ambani?". The Indian Express (इंग्रजी भाषेत). 25 February 2024. 7 March 2024 रोजी पाहिले.
  10. ^ "The net worths of Anant Ambani and Radhika Merchant and what they own". Lifestyle Asia India. 23 January 2024. 7 March 2024 रोजी पाहिले.
  11. ^ "Radhika Merchant wiki, age, father, mother, caste, religion, family". Bollywood Biography. 31 July 2020. 7 March 2024 रोजी पाहिले.
  12. ^ "Who Is Radhika Merchant? 8 Things You Should Know About Anant Ambani's Future Wife". www.filmibeat.com (इंग्रजी भाषेत). 29 December 2022. 7 March 2024 रोजी पाहिले.
  13. ^ "radhika-merchant-bio". bihar-cetbed-lnmu.in. 7 March 2024 रोजी पाहिले.
  14. ^ "Meet Radhika Merchant, the Ambani family's newest member; Know about her net worth and expensive things she owns". financialexpress.com. 7 March 2024 रोजी पाहिले.
  15. ^ "Who is Radhika Merchant? 9 things about Anant Ambani's Fiancé". www.businesstoday.in (इंग्रजी भाषेत). 1 March 2024. 7 March 2024 रोजी पाहिले.
  16. ^ "Bill Gates says Ambanis' pre-wedding event gave him excuse to..." mint (इंग्रजी भाषेत). 5 March 2024. 7 March 2024 रोजी पाहिले.
  17. ^ "Who Is Radhika Merchant, Soon-To-Be Mukesh Ambani and Nita Ambani's Daughter-In-Law". NDTV.com. 7 March 2024 रोजी पाहिले.