राजपुताना एजन्सी हा एक ब्रिटिश भारतातील संस्थानांचे एकत्रीकरण करून केलेला एक प्रशासकीय विभाग होता. याचे क्षेत्रफळ १,२७,५४१ चौ.मैल एवढे होते.

राजपुताना एजन्सीचे मानचित्र

चतुर्सिमा

संपादन

राजपुताना एजन्सीच्या उत्तरेला पंजाब प्रांत, वायव्येला बहावलपूर संस्थान, ईशान्य दिशेला संयुक्त प्रांत, आग्नेयेला मध्य भारत स्टेट एजन्सी आणि दक्षिणेला मुंबई इलाखा आणि नैऋत्येला सिंध प्रांत यांच्या सीमा होत्या.

प्रशासकीय विभाग

संपादन

राजपुताना एजन्सीचे उपविभाग:-

१. मेवाड रेसिडेन्सी

२. तरंगा रेसिडेन्सी

३. पश्चिम राजपुताना स्टेट एजन्सी

४. जयपूर रेसिडेन्सी

५. पश्चिम राजपुताना स्टेट रेसिडेन्सी

६. बिकानेर एजन्सी

७. तरंगागड

८. अलवार एजन्सी

९. पूर्व राजपुताना स्टेट एजन्सी

१०. हरावती टोंक एजन्सी

११. कोटा झालावाड एजन्सी

संस्थाने

संपादन

राजपुताना स्टेट एजन्सीतील संस्थाने:-

१. बिकानेर

२. जयपूर

३. अलवार

४. धोलपुर

५. भरतपूर

६. करौली

७. झालावाड

८. कोटा

९. बुंदी

१०. टोंक

११. लावा

१२. किसनगड

१३. मारवाड

१४. जैसलमेर

१५. सिरोही

१६. अबू

१७. पालनपुर

१८. दांता

१९. डुंगरपुर

२०. बांसवाडा

२१. कुशालगड

२२. प्रतापगड

२३. मेवाड

२४. शाहपूर

टोंक, भरतपूर आणि धोलपुर सोडून बाकीची सर्व संस्थाने हिंदू राजपुतांची होती. टोंक हे मुस्लिम संस्थानिकाचे, तर भरतपूर आणि धोलपुर हे जाट संस्थानिकांचे होते.

अजमेर-मेवाड विभाग

संपादन

राजपुताना एजन्सीच्या मध्य भागात अजमेर-मेवाड हा ब्रिटिश भाग होता.

स्वातंत्र्योत्तर कालखंड

संपादन

भारत स्वतंत्र झाल्यावर ही सर्व संस्थाने भारत विलीन झाली. सध्या हा प्रदेश राजस्थान या नावाने ओळखला जातो.