बिकानेर संस्थान हे ब्रिटीश भारतातल्या राजपुताना स्टेट्स एजन्सीतील एक संस्थान होते. या संस्थानाची राजधानी बिकानेर या नगरात होती. हे संस्थान राजस्थानातले एक मोठे संस्थान होते.

बिकानेर संस्थानाचा ध्वज
बिकानेर संस्थानाची राजमुद्रा
बिकानेर संस्थानचा राजवाडा- लक्ष्मी निवास राजवाडा

स्थापना संपादन

बिकानेर संस्थानाची स्थापना इ.स. १४६५ या वर्षी झाली.

संस्थानिक संपादन

राठोड घराणे हे बिकानेर संस्थानाचे संस्थानिक होते. बिकानेरचे महाराजा सादूल सिंह यांनी हे संस्थान १९४७ या वर्षी भारतीय संघराज्यात विलीन केले. असे असले तरी महाराजांच्या वारसाला प्रजेकडून राजाचा सन्मान मिळतो.

हिंदुस्थान देश स्वतंत्र झाल्यानंतरचा काळ संपादन

बिकानेर हा प्रजासत्ताक भारतातल्या राजस्थान राज्यातील एक जिल्हा आहे; बिकानेर शहर हे त्या जिल्ह्याचे मुख्यालय आहे.

बिकानेरचे संस्थानिक संपादन

क्र० नाव जन्मसाल इसवी सन राज्यारोहणसाल इसवी सन राज्यारोहणसमयी वय वर्षे - महिने मृत्युसाल इसवी सन कारकीर्द वर्षे-महिने मृत्युसमयी वय वर्षे - महिने
१. राव भिकाजी १४३८ १४६५ २७ - ० १५०४ ३९ - ० ६६ - २
२. राव नारोजी १४६८ १५०४ ३६ - ० १५०५ ० - ४ ३६ - ४
३. राव लुंकरणजी १४७० १५०५ ३५ - ० १५२६ २१ - ५ ५६ - ६
४. राव जैतसी १४८९ १५२६ ३६ - ९ १५४२ १५ - ८ ५२ - ५
५. राव कल्याणजी १५१९ १५४२ २३ - २ १५७१ २९ - ९ ५२ - ३
६. राजा रायसिंह १५४१ १५७१ २९ - ९ १६१२ ४० - ९ ७० - ६
७. राजा दलपतसिंह १५६५ १६१२ ४६ - ११ १६१४ १ - १० ४९ - ०
८. राजा सूरसिंह १५९५ १६१३ १८ - ११ १६३१ १७ - १० ३६ - ९
९. राजा करणसिंह १६१६ १६३१ १५ - ३ १६६९ ३७ - ८ ५२ - ११
१० महाराजा अनूपसिंह १६३८ १६६९ ३१ - ३ १६९८ २८ - १० ६० - २
११. महाराजा सरूपसिंह १६८९ १६९८ ८ - १० १७०० २ - ६ ११ - ४
१२. महाराजा सुजनसिंह १६९० १७०० १० - ५ १७३६ ३५ - १ ४५ - ४
१३. महाराजा जोरावरसिंह १६९० १७०० १० - ५ १७३६ ३५ - १ ४५ - ४
१४. महाराजा गजसिंह १७२३ १७४५ २२ - ३ १७८७ ४१ - ९ ६४ - ०
१५. महाराजा राजसिंह १७४४ १७८७ ४२ - ६ १७८७ २१ दिवस ४२ - ६
१६. महाराज प्रतापसिंह १७८१ १७८७ ६ - ० १७८७ ० - ४ ६ - ४
१७. महाराजा सुरतसिंह १७६६ १७८७ २१ - ९ १८२८ ४१ - ६ ४२ - ३
१८. महाराजा रतनसिंह १७९१ १८२८ ३७ - ४ १८५१ २३ - ४ ६० - ७
१९. महाराजा सरदारसिंह १८१८ १८५१ ३३ - ० १८७२ २० - ९ ५३ - ८
२०. महाराजा डुंगरसिंह १८५४ १९७२ १७ - ११ १८८७ १५ - १ ३३- ०
२१. महाराजा गंगासिंह १८५० १८८७ ६ - १० १९४३ ५५ - ० ६९ - ०
२२. महाराजा सादूलसिंह १९०२ १९४३ ४१ - ५ १९५० ७ - ६ ४८ - ०
२३. महाराजा करणीसिंह १९२४ १९५० २६- ५ १९८८ ३८ - ० ६४ - ४
२४. महाराजा नरेंद्रसिंह १९४६ १९८८ ४२ - ८ २००४
२५.