राखी रानकोंबडी

पक्ष्याचा कूळ

राखी रानकोंबडी, कोंबड, खैरी कोंबडी किंवा करडी जंगली कोंबडी (इंग्लिश:Grey Junglefowl; हिंदी : जंगली मुर्गी, भुरी जंगली मुर्गी; संस्कृत : कुक्कुट, यवग्रीव वन कुक्कुट; गुजराती : जंगली मरघी) हा एक कोंबडी कुळातील पक्षी आहे.

राखी रानकोंबडा
राखी रानकोंबडा

हा पक्षी आकाराने गावठी कोंबडीएवढा असतो. नर कोंबड्याचा रंग राखी असतो. मानेवर काळे, पांढरे व पिवळे ठिपके असतात. छातीवर व पाठीवर काळ्या पांढऱ्या बारीक उभ्या रेषा असतात. खांद्यावर नारिंगी रंगाचे लांबट ठिपके असतात. शेपटीला काळी हिरवट निळसर चमकदार विळ्यासारखी पिसे असतात. लाल व राखी कोंबड्याच्या मादीत फरक असतो. राखी कोंबडीची छाती पांढरी व तिच्यावर काळी किनार असलेली पिसे असतात. त्यामुळे ती खवल्यांसारखी दिसतात. हे पक्षी एकटे किंवा समूहाने राहतात. यांना फार दूर किंवा उंचावरून उडता येत नाही

घरटे : कोंबडी भुईवर खळगा करून किंवा बांबूच्या ताटव्यात टोपली सारखे घरटे करून त्यात अंडी घालते.

वितरण संपादन

हा पक्षी भारतीय द्वीपकल्पात अबूचा पहाड, पंचमढी, गोदावरीचे मुख या सीमा असलेल्या प्रदेशांत आढळतो. राखी आणि तांबडे कोंबडे जेथे-जेथे जवळ राहतात. तेथे-तेथे त्यांच्या संकरातून एक नवीनच जात निर्माण होते. फेब्रुवारी ते मे हा या पक्ष्याच्या विणीचा काळ आहे..

निवासस्थाने संपादन

राखी रानकोंबडी शुष्क पानगळीच्या जंगलांत तसेच दमट सदापर्णी वनांतील विरळ क्षेत्रात आढळतात. पर्वतीय प्रदेशांत शिखरापर्यंत आढळतात.