राखी बल्गुली
शास्त्रीय नाव Parus major
कुळ टीटाद्य (Paridae)
अन्य भाषांतील नावे
इंग्लिश great tit
संस्कृत भस्म बल्गुली
हिंदी रामगंगरा

वर्णन

संपादन

राखी बल्गुली हा पक्षी आकाराने चिमणी एवढा, पाठीकडून राखाडी रंगाचा, पोटाकडून पांढरा, डोके काळे, गाल, कंठ आणि छाती पांढऱ्या रंगाचे, तर पंखावर तुटक पांढऱ्या-काळ्या रेषा असलेला पक्षी आहे. याच्या रंग आणि आकारावरून अनेक उपजाती आहेत.

  राखी बल्गुली नराचा आवाज

वास्तव्य/आढळस्थान

संपादन

भारत, बांगलादेश, श्रीलंका, म्यानमार, पाकिस्तान या भारतीय उपखंडातील देशांमध्ये राखी बल्गुलीच्या किमान सात उपजाती आढळतात. तसेच युरोप, मध्य-पूर्व, मध्य आणि उत्तर आशिया, उत्तर आफ्रिका येथील देशांमध्येही विविध उपजाती आढळतात.

खाद्य

संपादन

राखी बल्गुली हा गवताळ कुरणे, पानगळीची विरळ जंगले, शेतीचे प्रदेश या ठिकाणी फळातील रस, कीटक, त्यांची अंडी, सुरवंट, विविध बिया खात एकट्याने किंवा लहान थव्याने फिरणारा पक्षी आहे.

प्रजनन काळ

संपादन

साधारणपणे फेब्रुवारी ते सप्टेंबर हा काळ राखी बल्गुलीचा प्रजनन काळ असून सहसा एका वर्षात दोनदा यांची वीण होते. गवत, पिसे वगैरे वापरून झाडाच्या ढोलीत किंवा कडेकपारीत असलेल्या फटीत, जमिनीपासून १ ते ५ मी. उंचीवर घरटे तयार केले जाते. मादी एकावेळी ८ ते १०, पांढऱ्या-गुलाबी रंगाची त्यावर लालसर-तपकिरी ठिपके असलेली अंडी देते. अंडी उबविण्याचे काम एकटी मादी करते पण पिलांना खाऊ घालणे, देखभाल नर-मादी मिळून करतात.

चित्रदालन

संपादन