राखी चिखल्या
पक्षी प्रजाती
राखी चिखल्या किंवा काळ्या पोटाची टिटवी (इंग्लिश:Blackbellied, Grey Plover; हिंदी:बडा बटन; संस्कृत:धूसर अतिजागर; गुजराती:बटण टिटोडी) हा एक पक्षी आहे.
हा पक्षी आकाराने गाव-तित्तिराएवढा असतो. ते हिवाळी पाहुणे असतात. त्यांची चोच मोठी असते. वरील भाग तपकिरी करडा, खालील भाग पंढुरका असतो. वसंत ऋतूत खालच्या भागावर काळ्या-पांढऱ्या रंगाची चिन्हे उमटतात. पोट आणि शेपटीखालून पांढरा रंग असतो.
वितरण
संपादनहे पक्षी भारताचे समुद्रकिनारे, श्रीलंका, लक्षद्वीप, मालदीव आणि निकोबार बेटे या ठिकाणी हिवाळ्यात आढळून येतात. होलार्क्टिक भागात त्यांची वीण होते.
निवासस्थाने
संपादनते दलदली, शेती, चिखलाणी आणि राने या ठिकाणी राहतात.
चित्रदालन
संपादनसंदर्भ
संपादन- पक्षिकोश - मारुती चितमपल्ली.