रश्मी बन्सल या लेखिका, उद्योजिका व युवा विशेष तज्ज्ञ आहेत. 'जॅम' (जस्ट अनदर मॅगझिन) या भारतातील आचाडीच्या युवा मासिकाच्या त्या सहसंस्थापक व संपादक आहेत. युवकांसाठीची करिअर्स व उद्योजकता हे त्यांच्या लिखाणाचे विषय आहेत. 'युथकरी' हा लोकप्रिय ब्लॉग त्या चालवतात. व्यापारविषयक बातम्यांची वाहिनी - यू टी व्ही आयवरील 'क्रॅकिंग करिअर्स' या करियरविषयक कार्यक्रमाच्या त्या सल्लागार संपादक आहेत. भारत्भरातील महविद्यालयीन विद्यार्थ्यांना व तरुण उद्योजकांना त्या आत्मीयतेने मार्गदर्शन करतात. सोफिया कॉलेज, मुंबई येथून अर्थशास्त्राची पदवी घेतलेल्या व आय आय एम् अहमदाबादच्या एम् बी ए असलेल्य रश्मी सध्या मुंबईत असतात. []

  1. ^ बन्सल, रश्मी (२००८). स्टे हंग्री स्टे फूलिश. पुणे: अमेय प्रकाशन. pp. ४१२. ISBN 978-81-907294-7-5.