रवी हे ताक व अन्य काही पदार्थ घुसळण्याचे साधन आहे.

पार्श्वभूमी

संपादन

या साधनाद्वारे प्रामुख्याने ताक घुसळले जाते. रवी हे साधन लाकडापासून, प्लास्टिकपासून, लोखंडापासून, व काही इतर धातूंपासून बनवलेले असते. या साधनाचा वरचा भाग तळाहाताने घासत खालील भांड्यातील पदार्थ घुसळला जातो.

विद्युत घुसळणी

संपादन

आधुनिक काळातील विद्युत घुसळणी हे रवीऐवजी वापरले जाणारे यंत्र आहे. हे यंत्र विद्युत उर्जेवर चालते. या यंत्राद्वारे श्रम वाचते.

पौराणिक संदर्भ

संपादन

पुराणातील समुद्रमंथन करताना देव व दानव यांनी मेरू पर्वताचा रवीसारखा आणि वासुकी नागाचा दोर केला. या घुसळणीतून १४ रत्ने निघाली असे मानले जाते.