रवींद्र राजाराम केळेकर
रवींद्र केळेकर (७ मार्च, इ.स. १९२५ कुकळ्ळी - ) हे कोकणी भाषेतील प्रसिद्ध साहित्यिक आहेत. २००६ सालच्या ज्ञानपीठ पुरस्काराचे ही ते विजेते आहेत. याशिवाय ते स्वातंत्र्य सेनानी व भाषातज्ञ ही आहेत. त्यांनी भारतीय स्वातंत्र्य संग्राम व गोवा मुक्ती आंदोलनातही भाग घेतला आहे. त्यांनी कोकणीत जवळपास १०० पुस्तके लिहिली आहेत. जाग ह्या कोकणी नियतकालिकाचे ते दोन दशकाहूनही आधिक काळ संपादक होते. ज्ञानपीठ पुरस्कारासोबत ते पद्मभूषण , साहित्य अकादमी पुरस्कारानेही सन्मानित झाले आहेत.
रवींद्र केळेकर | |
---|---|
राष्ट्रीयत्व | भारतीय |
कार्यक्षेत्र | कादंबरीकार |
साहित्य प्रकार | कादंबरी |
प्रभाव | महात्मा गांधी |
जीवन
संपादनकेळेकरांचा जन्म ७ मार्च, इ.स. १९२५ या दिवशी कुकळ्ळी या त्यांच्या आजोळी झाला. त्यांचे आजोबा (आईचे वडील) लिंगू रघूवीर दळवी हे व्यवसायाने वकील व पोर्तुगीज सरकारच्या सेवेत नोकरीला होते. रवींद्रांचे वडील व्यवसायाने डॉक्टर होते. रवींद्रांच्या वडिलांनी भगवद्गीतेचा पोर्तुगीज अनुवाद केला होता. त्यांचे बालपण दीवला गेले व तिथेच त्यांचे प्राथमिक शिक्षण गुजराती भाषेत झाले. वयाच्या तेराव्या वर्षी ते गोव्याला आले. त्यांचे माध्यमिक शिक्षण गोव्यात फोंडा येथील आल्मेद हायस्कूलमध्ये झाले. गोवा स्वातंत्र्यसंग्रामात केळेकरांचा सहभाग होता. गोव्याच्या महाराष्ट्रातील विलीनीकरणाला त्यांनी विरोध केला होता व त्या लढ्याचे त्यांनी नेतृत्वही केले होते. कोकणी राज्यभाषा करण्यासाठी गोव्यात उभारलेल्या लढ्यात ते अग्रेसर होते.
विचारसरणी
संपादनलढाऊ कार्यकर्ता आधी लेखक नंतर अशी केळेकरंची धारणा आहे. त्यांच्यावर महात्मा गांधीचा खोल प्रभाव आहे.
साहित्य सूची
संपादनहिमालयांत ह्या पुस्तकाने त्यांना प्रथम १९७६ साली साहित्य अकादमी पुरस्कार प्राप्त झाला.
- हिमालयांत(१९७६)
- नवी शाळा
- सत्याग्रह
- मंगल प्रभात
- महात्मा
- आशे आशिल्ले गांधीजी
- कथा आनि कान्यो
- तुळशी
- वेळेवाईल्लो गुलो
- भज ग़ोविन्दम
- ऊजवडेचे सूर
- भाषेचे समाज शास्त्र
- मुक्ति
- तीन एके तीन
- लाला बाला
- ब्रह्माण्डातले तांडव
- पान्थस्थ
- समिधा
- वोथम्बे
- सर्जकाची अंतर कथा
- महाभारत (भाषांतर)
- जपान जसा दिसला
- गांधीजींच्या सहवासात
- गांधी -एक जीवनी : हे चरित्र अलाहाबाद विद्यापीठाच्या अभ्यासक्रमात समाविष्ट झाले होते.