रफीक शेख (गिर्यारोहक)

रफीक शेख हे एक माउंट एव्हरेस्ट सर करणारे मराठी गिर्यारोहक आहेत.

एव्हरेस्ट सर करण्यात त्यांना १९ मे, २०१६ रोजी तिसऱ्या प्रयत्‍नात यश आले. या आधी त्यानी दोनदा एव्हरेस्ट सर करण्याचा प्रयत्‍न केला होता. परंतु २०१४ सालच्या मोसमात झालेल्या हिमस्खलन अपघातात १६ शेरपा मृत्युमुखी पडले होते. त्यामुळे शेख यांनीही मोहीम अर्धवट टाकली. त्यानंतर २०१५मधील प्रयत्नास नेपाळमधील भूकंप होउन बेस कॅंपवर हिमकडा कोसळल्याने त्यांची ही मोहीमही अर्धवट राहिली.

रफीक शेख हे महाराष्ट्र ग्रामीण पोलीस दलात औरंगाबाद जिल्ह्यातील खुलताबाद या शहरात नेमणूक झालेले कॉन्स्टेबल आहेत. आपली पोलीस खात्यातील काम करून त्या परिसरातील डोंगर चढायचा सराव करीत असत. पाठीवर २० किलो वजन घेऊन दौलताबादचा किल्ला ते चढत आणि उतरत. सतत चार वर्षे त्यांनी हा सराव केला.

दहा वर्षे तयारी

संपादन

एव्हरेस्ट सर करण्याच्या दृष्टीने शेख यांनी दहा वर्षांपूर्वी मराठ्वाडा परिसरात तयारी सुरू केली होती. हिमालयातील आठ शिखरे त्यांनी आधीच सर केली होती. त्यांनी दहा वर्षे दररोज सायकलिंग, पाठीवर सामान घेऊन स्थानिक डोंगरांवर चढाई केली तसेच तज्ज्ञ गिर्यारोहकांचे मार्गदर्शन घेतले.

एव्हरेस्ट मोहिमे साठी लागण्याऱ्या प्रत्येकी किमान २५ लाख रुपये खर्चासाठी शेख यांनी पोलीस कर्मचारी सोसायटीतून आणि बँकेतून कर्ज घेतले तसेच औरंगाबादचे उद्योजक, प्राध्यापक आणि सहकाऱ्यांकडूनही मदत घेतली.