रणजितसिंह डिसले

वैश्विक शिक्षक पुरस्कार विजेते २०२०

रणजितसिंह डिसले ( ५ आगस्ट १९८८) हे महाराष्ट्रातील एक शिक्षक आहेत. सोलापूर जिल्ह्यातल्या माढा तालुक्यातील परितेवाडीच्या जिल्हा परिषद शाळेत ते प्राथमिक शिक्षक म्हणून काम करतात.[१]

रणजितसिंह डिसले
राष्ट्रीयत्व भारतीय
पेशा शिक्षक
पुरस्कार ग्लोबल टीचर प्राइज

सुरुवातीचे जीवन आणि शिक्षण संपादन

रणजितसिंह डिसले हे मूळचे सोलापूर जिल्ह्यातली बार्शी तालुक्यातले आहेत. त्यांचे शालेय शिक्षण बार्शीतील सुलाखे विद्यालयामध्ये झाले. ते २००९ पासून प्राथमिक शिक्षक म्हणून काम करत आहेत.[२] विद्यार्थ्यांना माहिती तंत्रज्ञान आणि क्यूआर कोडच्या सहाय्याने शिकवण्यासाठी डिसले प्रसिद्ध आहेत. त्यांनी माहिती तंत्रज्ञानाचा वापर करून, शिकवण्याचे नवे तंत्र विकसित केले आहे; तसेच इतर शिक्षकांनाही टेक्नोसॅव्ही होण्यासाठी प्रेरीत केले आहे. आयटीच्या प्रभावी वापरासाठी त्यांनी स्वतःची छोटेखानी प्रयोगशाळा उभारली आहे. त्याचप्रमाणे लॉकडाउनमध्येही तंत्रज्ञान आणि सोशल मीडियाचा प्रभावी वापर करून विद्यार्थ्यांना शिकवले.[१][३][४][५]

ग्लोबल टीचर प्राइज संपादन

३ डिसेंबर २०२० रोजी, युनेस्को व लंडनस्थित वार्की फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने दिला जाणारा ग्लोबल टीचर प्राइज रंजितसिंह डिसले यांना जाहीर झाला आहे.[६] या पुरस्काराची रक्कम १ मिलियन अमेरिकन डॉलर्स म्हणजे ७ कोटी रुपयांहून अधिक आहे. हा पुरस्कार मिळवणारे डिसले हे पहिले भारतीय शिक्षक आहेत. या पुरस्कारासोबतच डिसले यांचा जगातील सर्वोत्तम शिक्षक म्हणून गौरव करण्यात आला आहे.[३][४] या पुरस्कारासाठी जगभरातून तब्बल १२ हजार नामांकनं दाखल झाली होती. त्यापैकी १० शिक्षकांना अंतिम यादीत स्थान मिळालं.[१][२][७]

याआधी डिसले यांना मायक्रोसॉफ्ट फाउंडेशनचा शिक्षण क्षेत्रातील पुरस्कार मिळाला होता. QR कोडचा वापर करून मुलांना पुस्तकातील कविता, धडे, अधिक माहिती मिळवता येते, या त्यांच्या कल्पकतेला तो पुरस्कार मिळाला होता.[२]

विवाद संपादन

सोलापूरचे शिक्षण विभाग व डाएट (जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था)चे प्राचार्य डॉ. रामचंद्र कोरडे यांच्या म्हणण्यानुसार डिसले सरांना "डाएट'वर (जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था) तीन वर्षांसाठी प्रतिनियुक्‍ती देण्यात आली होती परंतु ते तिकडे फिरकले देखील नाहीत.[८][९]

बाह्य दुवे संपादन

संदर्भ संपादन

  1. ^ a b c "Ranjitsinh Disale". Varkey Foundation (इंग्रजी भाषेत). 2020-12-03 रोजी पाहिले.[permanent dead link]
  2. ^ a b c "BBC News मराठी".
  3. ^ a b "सोलापूर जि. प. शिक्षक रणजितसिंह डिसले यांना ७ कोटी रुपयांचा 'ग्लोबल टीचर पुरस्कार'". Maharashtra Times. 2020-12-03 रोजी पाहिले.
  4. ^ a b "सोलापूरचे शिक्षक रणजितसिंह डिसलेंना ७ कोटींचा ग्लोबल टीचर पुरस्कार". Loksatta. 2020-12-03. 2020-12-03 रोजी पाहिले.
  5. ^ टीम, एबीपी माझा वेब (2020-12-03). "Maharashtra Teacher wins Global Prize: सोलापुरातील शिक्षक रणजितसिंह डिसले यांना 7 कोटी रुपयांचा 'ग्लोबल टीचर पुरस्कार' जाहीर". marathi.abplive.com. 2020-12-03 रोजी पाहिले.
  6. ^ "Global Teacher Prize". Varkey Foundation (इंग्रजी भाषेत). 2020-12-03 रोजी पाहिले.
  7. ^ "Global Teacher Prize 2020 Finalists". Varkey Foundation (इंग्रजी भाषेत). Archived from the original on 2020-12-05. 2020-12-03 रोजी पाहिले.
  8. ^ लोकसत्ता विश्लेषण : 'ग्लोबल टीचर' रणजित डिसलेंच्या राजीनाम्यापर्यंत विषय जाण्याइतकं घडलंय तरी काय?"
  9. ^ Solapur: प्राचार्यांचे स्पष्टीकरण! "डाएट'कडे डिसले गुरुजी फिरकलेच नाहीत