रंगसूत्र

संपादन

पेशीमध्ये डीएन्एचा रेणू हा प्रथिनांसोबत बंदिस्त असतो. डीएन्एचा रेणू आणि त्याच्यासोबत असलेली बंदिस्त प्रथिने यांना एकत्रितपणे रंगसूत्र असे म्हणतात. डीएन्एला बांधलेल्या प्रथिनांचे कार्य हे त्याला कमी जागेत सामावणे तसेच त्याच्या कार्यांवर अंकुश ठेवणे हे असते. रंगसूत्रांना गुणसूत्रे असेही म्हणतात.