येशू ख्रिस्ताच्या आधुनिक संतांचे चर्च

येशू ख्रिस्ताच्या आधुनिक संतांचे चर्च (इंग्लिश: The Church of Jesus Christ of Latter-day Saints; इतर नावे: मॉर्मन चर्च, एलडीएस चर्च) हा ख्रिस्ती धर्माच्या उपधर्मांपैकी एक आहे. ह्या धर्माची स्थापना १८३० साली जोसेफ स्मिथ, ज्युनियर ह्या धार्मिक पुढाऱ्याने अमेरिकेच्या न्यू यॉर्क राज्यामध्ये केली. ह्या चर्चचे मुख्यालय युटाच्या सॉल्ट लेक सिटी ह्या शहरामध्ये असून जगभर त्याचे ५०,००० प्रचारक व १.४१ कोटी अनुयायी आहेत.

सॉल्ट लेक मंदिर हे मॉर्मन धर्मामधील सर्वात मोठे प्रार्थनागृह आहे.

बाह्य दुवेसंपादन करा

  • LDS.org एलडीएस चर्चचे अधिकृत संकेतस्थळ