येडशी रामलिंग घाट वन्यजीव अभयारण्य
येडशी रामलिंग घाट अभयारण्य हे धाराशिव जिल्ह्यात आहे. स्थापना १९९७ साली झाली आहे. क्षेत्रफळ - २२.३८ चौ.किमी. या अभयारण्यात लांडगा, हरीण, माकडे, मोर इत्यादी प्राणी पाहायला मिळतात. तसेच तेथे एक प्राचीन राम मंदिर आहे. मंदिरा पासून थोड्या अंतरावर एक धबधबा आहे. या धबधब्याखाली एक गुहा आहे. त्या गुफेची अशी अख्याईका आहे की, जेव्हा रावण सितेला घेऊन लंकेला चालला होता तेव्हा तो तिथे मुक्कामाला थांबला होता. तिथे एक आंघोळीची न्हाणी आहे. त्या न्हानी मध्य सीतेने अंघोळ केली होती. तिथे रावणाची आणि गरुडाची लढाई झाली होती. तेव्हा रावणाने त्या गरुडाचे पंख कापले आणि त्याला ठार मारले होते. तिथे त्या गरुडाची समाधी आहे.
हा लेख/विभाग स्वत:च्या शब्दात विस्तार करण्यास मदत करा. |