युवक क्रांती दल ही १९६७ साली पुण्याच्या महाविद्यालयामधील तरुण विद्यार्थी-विद्यार्थिनींनी मिळून सुरू केलेली एक चळवळ आहे. संक्षेपाने या चळवळीला युक्रांद असे ओळखले जाते.[ संदर्भ हवा ] सत्याग्रही समाजवाद हा या संघटनेचा पाया होता. पर्यायाने हा पक्ष समाजवादी पक्षाचे एक छक्कल होते. महात्मा गांधी, डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि राममनोहर लोहिया यांच्या विचारधारेने प्रभावित झालेले युवक मुख्यत या चळवळीत सामील झाले होते. वर्गमुक्त, जातमुक्त आणि पुरोगामी नवसमाज तयार करण्यासाठी संघर्ष करणे, दलितांचे मुक्ती लढे अहिंसात्मक पद्धतीने लढणे हा या संघटनेचा मुख्य कार्यक्रम होता.[ संदर्भ हवा ] १९७० ते १९८० हा या चळवळीचा सुवर्णकाळ होता. पुणे, मराठवाडा आणि मुंबईमध्ये मुख्यत: चळवळीचा प्रभाव होता.


या दरम्यान युक्रांदने डॉ. कुमार सप्तर्षी यांच्या नेतृत्वाखाली अनेक आंदोलने केली व यशस्वी करून दाखवली. १९७५ ते १९७७ या आणीबाणीच्या काळात युक्रांदचे अनेक कार्यकर्ते कारावासात होते. यानंतर संघटनेमध्ये फुट पडली व डॉ. कुमार सप्तर्षी यांच्यासह अनेक कार्यकर्त्यानी संसदीय राजकारणात प्रवेश केला आणि जनता पक्षात प्रवेश करून निवडणूक लढवली.[ संदर्भ हवा ] २००१ साली या संघटनेची पुनःस्थापना झाली. त्यानंतर ही संघटनेने अनेक आंदोलने लढवून यशस्वी करून दाखवली आहेत. सध्या डॉ. कुमार सप्तर्षी हे या संघटनेचे अध्यक्ष आहेत आणि जांबुवंत मनोहर हे कार्यवाह म्हणून काम पाहत आहेत.[ संदर्भ हवा ]

युक्रांदची वैचारिक भूमिका

संपादन

स्पष्ट व ठाम वैचारिक पुरोगामी भूमिका हे नेहमी युक्रांदचे वैशिष्ट्य राहिले आहे. माणसाच्या जन्मावर आधारित जातीव्यवस्था व आधुनिक भांडवलशाहीने आणलेली शोषण व्यवस्था या दोन्हीविरोधी संघर्ष करून जातमुक्त व वर्गमुक्त भारतीय समाज तयार करण्यासाठी सातत्याने प्रयत्न करणे, मानवतेवर आधारीत राष्ट्रवादासाठी काम करणे. यासाठी राष्ट्रपिता महात्मा गांधी यांनी सांगितलेला सत्याग्रहाचा मार्ग अवलंबणे ही युक्रांदची वैशिष्ट्ये होती.[ संदर्भ हवा ]

डॉ. कुमार सप्तर्षी यांच्या नेतृत्वाखाली युक्रांदने पुढील आंदोलने लढवली व यश संपादन केले. या सर्व आंदोलनात युक्रांदने आक्रमक अहिंसेचा वापर केला. आम्ही गप्प बसून अन्याय सहन करणार नाही आणि निषेध व्यक्त करताना कुठेही हिंसेचा वापर करणार नाही ही ठाम भूमिका घेऊन आंदोलने केली.[ संदर्भ हवा ]

युक्रांदने केलेली आंदोलने

संपादन
  • जुलै १९६८ पुण्यातील महाविद्यालयानी केलेल्या फी वाढीविरोधात विद्यार्थ्यांचे आंदोलन उपोषण.[ संदर्भ हवा ]
  • जुलै १९७१ महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी -कुलगुरू हटाओ आंदोलन पुणे, धुळे, कोल्हापूर, मुंबई.[ संदर्भ हवा ]
  • जून १९७२ सोलापूर मेडिकल क़ॉलेज कॅपिटेशन फी विरोधी आंदोलन – दमाणी हटाव शहरातील विविध जनविभाग आणि जिल्ह्यातील विविध जनविभाग सामील – महाराष्ट्र सरकारने कुमार सप्तर्षी यांच्या विरोधात प्रथम मिसाचा वापर केला.[ संदर्भ हवा ]
  • ऑगस्ट १९७२ लातूर येथील गोळीबार व संचारबंदी याविरुद्ध आंदोलन गोळीबार होऊनही कर्फ्यूत सामान्य जनतेचा सहभाग.[ संदर्भ हवा ]
  • जून १९७३ व १९७८ आयुर्वेद क़ॉलेजच्या विद्यार्थ्यांचे आंदोलन.[ संदर्भ हवा ]
  • जुलै १९७३ बी. एड. क़ॉलेज विद्यार्थ्यांचे आंदोलन मालेगाव (नाशिक).[ संदर्भ हवा ]
  • डिसेंबर १९७३ आघाव ट्रेनिंग क़ॉलेज धुळे विद्यार्थी आंदोलन.[ संदर्भ हवा ]
  • जाने १९७४ दलित विद्यार्थ्यांच्या मासिक शिष्यवृत्तीत वाढ- अखिल भारतीय पातळीवरील आंदोलन- औरंगाबाद प्रमुख केंद्र.[ संदर्भ हवा ]
  • जून १९७४ मराठवाडा विकास आंदोलन य़ुक्रांद संघटनेच्या नेतृत्वाखाली[ संदर्भ हवा ]
  • मे १९७७ शेडगाव ता. कर्जत जि. अहमदनगर येथील दत्त मंदिरात दलिताना प्रवेश मिळवुन देण्याचे आंदोलन[ संदर्भ हवा ]

याशिवाय डॉ. कुमार सप्तर्षी यांच्यासह युक्रांदच्या अनेक कार्यकर्त्यानी मराठवाडा विद्यापीठ नामांतर व अनेक पुरोगामी चळवळीत भाग घेऊन आपले योगदान दिले आहे. डॉ. कुमार सप्तर्षी यांनी पुरीचे शंकराचार्य यांच्याशी पुण्यामध्ये केलेल्या वादविवादाचे देशभर पडसाद उमटले होते.[ संदर्भ हवा ]

राशीन कम्युन हा युक्रांदच्या कार्यकर्त्यानी केलेला आगळावेगळा प्रयोग होता. राज्याच्या विविध भागातील कार्यकर्त्यानी जाऊन राशीन सारख्या ग्रामीण भागात दलित वस्तीत जाऊन मुक्काम ठोकायचा आणि आजूबाजूच्या गावातून लोकजागृती करायची आणि ग्रामीण भागातील सरंजामशाही व्यवस्थेला आव्हान देण्यासाठी एक प्रारूप तयार करायचे असा यापाठीमागचा हेतू होता. परंतु तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी आणीबाणी जाहीर केल्यानंतर कम्युन मधील सर्वांना अटक झाली.[ संदर्भ हवा ]

आणीबाणीच्या दरम्यान युक्रांदचे अनेक कार्यकर्ते १९ महिने अटकेत होते. त्यानंतर युक्रांदमध्येच फुट पडली. डॉ. कुमार सप्तर्षी, अरुण लिमये, रत्नाकर महाजन आणि अनेक कार्यकर्त्यानी जयप्रकाश नारायण यांच्या आहावानानुसार जनता पक्षात प्रवेश केला आणि निवडणूक लढवली. २००१ मध्ये ज्येष्ठ्य कार्यकर्त्यांच्या विनंतीवरून डॉ. कुमार सप्तर्षी यांनी पुन्हा युक्रांदची नवीन सुरुवात केली. नव्या युक्रांदने खालील आंदोलने केलेली आहेत.[ संदर्भ हवा ]

  • २००३ मध्ये सांगली येथील जैन साध्वीच्या बलात्कार प्रकरणी केलेले आंदोलन
  • २००६ बीड पुणे लोहमार्गासाठी केलेले आंदोलन
  • फेब्रुवारी २०११ शिक्षणसेवकांचे जिल्हावाद विरोधी आंदोलन
  • एप्रिल २०१७ पासून न्यू कोपरे गावातील (जि. पुणे) गावातील प्रकल्पग्रस्तांचे आंदोलन

युक्रांदमध्ये काम केलेल्या प्रमुख कार्यकर्त्यांची नावे

= प्रमुख कार्यकर्ते[ संदर्भ हवा ]

संपादन

१. डॉ. कुमार सप्तर्षी

२. डॉ. अरुण लिमये

३. नरेंद्र दाभोळकर

४. अन्वर राजन

५. डॉ. उर्मिला सप्तर्षी

६. डॉ. रत्नाकर महाजन

७. व्यंकप्पा पत्की

८. नंदा पाटील

९. नीलम गोऱ्हे

१०. आनंद करंदीकर

११. अजित सरदार

१२. वसुधा सरदार

१३. विजय दर्प

१४. रंगा रायचूरे

१५. शेषराव निसर्गंध

१६. शांताराम पंदेरे

१७. मंगल खिवसरा

१८. संदीप बर्वे

१९. अप्पा अनारसे

२०. कमलाकर शेटे

२१. जांबुवंत मनोहर

२२. रवी लाटे

२३. सुदर्शन चखाले

२४. सुदाम लगड

२५. रोहनसिंह गायकवाड

२६. डॉ. प्रवीण सप्तर्षी

२७. युवराज मगदूम

२८. आदित्य आरेकर

२९. सचिन चौहान

३०. अभिजित मंगल

३१. दादा राऊत

३२. शाम तोडकर

संदर्भ

संपादन

२. The Experience of Hinduism: Essays on Religion in Maharashtra लेखक एलिनोर झेलीएट व म्याक्सिम बर्न्सन

३. पुणे विद्यापीठाच्या संकेत स्थळावरील कागदपत्रे

४. रिसर्च गेट