युनिफाईड पेमेंट इंटरफेस

पैसे भरणा पद्धती
Unified Payments Interface (it); ইউনিফাইড পেমেন্ট ইন্টারফেস (bn); Unified Payments Interface (fr); युनिफाईड पेमेंट इंटरफेस (mr); Unified Payments Interface (de); ୟୁପିଆଇ (or); Unified Payments Interface (hy); 统一支付接口 (zh); یونیفائڈ پے منٹس انٹرفیس (ur); ഏകീകൃത പണമടയ്ക്കൽ സമ്പർക്കമുഖം (ml); ඒකාබද්ධ ගෙවීම් ක්‍රමවේදය (si); ಏಕೀಕೃತ ಪಾವತಿ ವ್ಯವಸ್ಥೆ (kn); Unified Payments Interface (en); एकीकृत भुगतान अन्तरापृष्ठ (hi); యూనిఫైడ్ పేమెంట్స్ ఇంటర్‌ఫేస్ (UPI) (te); ਯੂ ਪੀ ਆਈ (pa); ইউনিফাইড পেমেণ্টচ ইণ্টাৰফেচ (as); واجهة المدفوعات الموحدة (ar); 统一支付接口 (zh-hans); ஒருமித்த கொடுக்கல் இணைப்பிடைமுகம் (ta) पैसे भरणा पद्धती (mr); भारत में अंतर-बैंक हस्तांतरण के लिए डिजिटल भुगतान प्रणाली (hi); 印度支付系统 (zh); digital payment system for inter-bank transfer in India (en); আন্তঃব্যাংক স্থানান্তরের জন্য ডিজিটাল পেমেন্ট সিস্টেম (bn); 印度支付系统 (zh-hans); யுபிஐ (ta) UPI (en); ইউপিআই (bn); 统一支付界面 (zh)

एकात्मिक भरणा पद्धती - युनिफाईड पेमेंट इंटरफेस Unified Payment Interface (UPI) ही एक अत्यंत सोपी, सुरक्षित व तत्काळ पैसे चुकते करता येणारी सुविधा आहे. यामुळे ऑनलाईन भरणा करण्याची सुविधा सरकारतर्फे देण्यात आली आहे. दि. ११ एप्रिल २०१६ पासून भारतीय रिझर्व बँकनॅशनल पेमेंट कॉर्पोरेशन ऑफ इंडिया (एनपीसीआई) संयुक्त विद्यमाने ही प्रणाली कार्यान्वित केली आहे. ही सुविधा वापरून एकावेळी किमान रु. १० व कमाल एक लाख रुपये इतका भरणा तत्काळ करता येतो. यासाठी लाभार्थींच्या बँकेचे नाव, खाते नंबर, आयएफएससी कोड यासारखी कोणतीही माहिती आवश्यक नसते.

युनिफाईड पेमेंट इंटरफेस 
पैसे भरणा पद्धती
 
माध्यमे अपभारण करा
  विकिपीडिया
प्रकारtechnical standard
उपवर्गpayment system
स्थान भारत
मालक संस्था
चालक कंपनी
विकसक
स्थापना
  • एप्रिल ११, इ.स. २०१६
अधिकृत संकेतस्थळ
अधिकार नियंत्रण
साचा:Translations:Template:Wikidata Infobox/i18n/msg-editlink-alttext/mr

उपयोग

संपादन

युनिफाईड पेमेंट इंटरफेस सुविधा वापरल्याने कोणत्याही व्यक्तीला कोणालाही पैसे देणे शक्य आहे. तसेच कोणाकडूनही पैसे घेता येणार आहेत. याशिवाय विविध बिले ऑनलाईन देता येणे शक्य आहे. या सुविधेचा उपयोग ऑनलाइन शॉपिंग साठीही करता येणार आहे.

चित्र:Unified Payment Interface Government publication.jpg
युनिफाईड पेमेंट इंटरफेस सरकारी प्रकाशन

माहिती

संपादन

युनिफाईड पेमेंट इंटरफेस वापरण्यासाठी फक्त संबंधिताचा व्हर्च्युअल पेमेंट अड्रेस (व्हीपीए) माहीत असणे आवश्‍यक असते.

वापराची पद्धती

संपादन

यूपीआय वापरासाठी नोंदणी - रजिस्ट्रेशन करावे लागते. त्यासाठी यूपीआय ऍप उतरवून घ्यावे. व आपल्या बँकेशी जोडावे.

युपीआय-भागीदार बँकमध्ये खाते असलेला अँड्रॉईड स्मार्टफोन वापरकर्ता युपीआय ॲप डाऊनलोड करु शकतो.

युपीआय सक्षम ॲपमध्ये नोंदणी करणे: []

नोंदणी करण्याच्या पायऱ्या:

   १. वापरकर्ता ॲप स्टोअर / बँकेच्या संकेतस्थळावरून युपीआय अर्ज डाऊनलोड करतो.
   २. वापरकर्ता नाव, आभासी (व्हर्च्युअल) आयडी, पासवर्ड यासारखी माहिती देऊन त्याचे प्रोफाईल तयार करतो.
   ३. वापरकर्ता “Add/Link/Manage Bank Account” पर्याय निवडतो आणि बँक आणि खाते क्रमांक व्हर्च्युअल आयडीशी जोडतो.

एम-पीन तयार करणे:

   १. ज्या बँक खात्यावरून व्यवहार करायचा आहे ते बँक खाते वापरकर्ता निवडतो
   २. गरजेची माहिती भरली जाते जसे 'डेबिट कार्डचे शेवटचे ६ अंक' आणि 'समाप्तीचा दिनांक'
   ३. बँकेकडून आलेला ओटीपी प्रविष्ट केला जातो आणि ४-६ अंकी एम-पीन तयार केले जाते

फायदे

संपादन
  • सरकारी एकात्मिक भरणा (युनिफाईड पेमेंट इंटरफेस) पद्धतीचा वापर केला तर दैनंदिन रोखीचे व्यवहार कमी होतील.
  • चेक, क्रेडिट कार्ड, डेबिट कार्ड, एटीएम यांचा वापर कमी होते.
  • अर्थव्यवस्थेतील रोख रकमेचे व्यवहार कमी होऊन जोखीम कमी होते.
  • पैसे आपल्या बँक खात्यातच रहात असल्याने व्याजाचेही नुकसान होत नाही.

युपीआय सेवा देणाऱ्या संस्था

संपादन

पीएसपी आणि इश्युयर बँका

  1. अलाहाबाद बँक
  2. ॲक्सिस बँक
  3. आंध्रा बँक
  4. आयडीएफसी बँक
  5. आयसीआयसीआय बँक
  6. इंडसइंड बँक
  7. एचडीएफसी बँक
  8. ओरिएंटल बँक of कॉमर्स
  9. कर्नाटक बँक
  10. कॅथोलिक सिरियन बँक
  11. कॅनरा बँक
  12. कोटक महिंद्रा बँक
  13. टीजेएसबी बँक
  14. डीसीबी बँक
  15. पंजाब नॅशनल बँक
  16. फेडरल बँक
  17. बँक ऑफ बडोदा
  18. बँक ऑफ महाराष्ट्र
  19. युको बँक
  20. युनायटेड बँक ऑफ इंडीया
  21. युनियन बँक ऑफ इंडीया
  22. येस बँक
  23. विजया बँक
  24. साऊथ इंडियन बँक
  25. स्टेट बँक ऑफ इंडीया

इश्युयर बँका:

  1. आयडीबीआय बँक
  2. आरबीएल बँक
  3. इंडियन बँक
  4. एचएसबीसी
  5. देना बँक
  6. सेंट्रल बँक ऑफ इंडीया
  7. स्टॅंडर्ड चार्टर्ड बँक

बँकेतर युपीआय ॲप:

  1. अल्फापे
  2. जुगनू पे
  3. ट्रूपे
  4. नुपे
  5. पेसे
  6. फिन्मो
  7. फोनपे
  8. मायपूलीन
  9. स्प्लिटकार्ट

अधिक माहिती व बाह्य दुवे

संपादन

हे ही पाहा

संपादन
  1. ^ "युनिफाईड पेमेंट इंटरफेस".