युंगेची लढाई
युंगेची लढाई ही चिले आणि पेरू-बोलिव्हियाच्या सैन्यांमध्ये लढली गेलेली लढाई होती. २० जानेवारी, १८३९ रोजी झालेल्या या लढाईत चिलेच्या सैन्याने पेरू-बोलिव्हियाचा पराभव केला. यानंतर पेरू-बोलिव्हियाचे संयुक्त राजतंत्र संपुष्टात आले व त्याचा राष्ट्राध्यक्ष आंद्रेस दि सांता क्रुझने कोलंबियामध्ये आश्रय घेतला.
साधारणपणे समान बळाच्या सैन्यांत लढल्या गेलेल्या या लढाईमध्ये पेरू-बोलिव्हियाने ६,००० पैकी ३,००० सैनिक गमावले तर चिलेच्या ५,४०० सैनिकांपैकी ६६४ मृत्युुमुखी पडले.