यिंगलक शिनावत्रा
(यिंगलक शिनावत या पानावरून पुनर्निर्देशित)
यिंगलक शिनावत्रा (थाई: ยิ่งลักษณ์ ชินวัตร ; रोमन लिपी: Yingluck Shinawatra ; जन्मः जून २१, इ.स. १९६७) ही एक थाई राजकारणी व देशाची माजी पंतप्रधान आहे. जून २०११ मधील सार्वत्रिक निवडणुकांमध्ये फिउ थाई पक्षाला बहुमत मिळावून शिनावत्रा थायलंडची २८ वी पंतप्रधान बनली. हा मान मिळवणाऱी ती पहिलीच थाई महिला आहे.
यिंगलक शिनावत्रा ยิ่งลักษณ์ ชินวัตร | |
थायलंडची पंतप्रधान
| |
कार्यकाळ ५ ऑगस्ट २०११ – ७ मे २०१४ | |
राजा | भूमिबोल अदुल्यदेज |
---|---|
मागील | अभिसित वेज्जाजीवा |
पुढील | प्रयुत चान-ओचा |
जन्म | २१ जून, १९६७ चियांग माई, थायलंड |
राष्ट्रीयत्व | थाई |
राजकीय पक्ष | फिउ थाई पक्ष |
धर्म | बौद्ध धर्म |
सही |
सुमारे ३ वर्षे सत्तेवर राहिल्यानंतर ७ मे २०१४ रोजी थायलंडच्या उच्च न्यायालयाने शिनावत्राला सत्तेचा गैरवापर, भ्रष्टाचार इत्यादी आरोपांवरून सत्ता सोडण्याचा आदेश दिला. २३ मे २०१४ रोजी थायलंडातील लष्करी बंडादरम्यान शिनावत्रा व तिच्या सहकाऱ्यांना अटक करण्यात आली.
संदर्भ
संपादनबाह्य दुवे
संपादनविकिमीडिया कॉमन्सवर संबंधित संचिका आहेत