यांको टिप्सारेविच (सर्बियन: Јанко Типсаревић) हा एक सर्बियन टेनिसपटू आहे. २००२ सालापासून व्यावसायिक टेनिस खेळत असलेल्या टिप्सारेविचने एप्रिल २०१२ मध्ये ए.टी.पी. जागतिक क्रमवारीमध्ये आठवा क्रमांक गाठला होता. टिप्सारेविचने आजवर २०१३ सालच्या चेन्नई ओपनसह ४ एकेरी अजिंक्यपदे मिळवली आहेत. तो नोव्हाक जोकोविच खालोखाल सर्बियाचा दुसऱ्या क्रमांकाचा पुरुष टेनिस खेळाडू मानला जातो.

यांको टिप्सारेविच
देश सर्बिया
वास्तव्य बेलग्रेड, सर्बिया
जन्म २२ जून, १९८४ (1984-06-22) (वय: ४०)
बेलग्रेड, युगोस्लाव्हिया
सुरुवात २००२
शैली उजव्या हाताने
बक्षिस मिळकत $७३,४७,००४
एकेरी
प्रदर्शन 286–254
अजिंक्यपदे
क्रमवारीमधील
सर्वोच्च स्थान
क्र. ८ (२ एप्रिल २०१२)
दुहेरी
प्रदर्शन 78–100
अजिंक्यपदे
क्रमवारीमधील
सर्वोच्च स्थान
क्र. ४६
शेवटचा बदल: जाने २०१४.

बाह्य दुवे

संपादन