यशोदा गर्ल्स आर्ट्स अँड कामर्स कालेज स्नेहनगर, नागपूर
यशोदा गर्ल्स आर्ट्स अँड कामर्स कालेज स्नेहनगर, नागपूर
प्रा गोविंद ना. रावळेकर- मराठी विभाग
लेख - सावित्रीबाई फुले
सबंध स्त्रियांच्या उद्धारासाठी ज्यांनी आपले सर्वस्व अर्पण केले . समाजनिंदेची पर्वा न करता ज्या अव्याहातपणे झटल्या. सर्व प्रकारची मानहानी सहन करून ज्यांनी अखेरपर्यत माघार घेतली नाही व पतिची सोबत दिली . त्या महान महिलेचे व महाराष्ट्रातील पहिल्या स्त्री शिक्षिकेचे नाव म्हणजे सावित्रीबाई फुले . थोर समाजसुधारक ज्योतिबा फुले यांच्या पत्नी . ३ जानेवारी १८३१ रोजी सातारा जिल्ह्यातील खंडाळा तालुक्यात नायगावयेथील नेवासे कुटुंबात सावित्रीबीचा जन्म झाला. वयाच्या अवघ्या तेराव्या वर्षी सावित्रीबीचा ज्योतिबांशी विवाह झाला.