यज्ञदत्त शर्मा

भारतीय राजकारणी

यज्ञदत्त शर्मा (ऑक्टोबर २१, इ.स. १९२२ - जुलै ४, इ.स. १९९६) हे भारतीय जनसंघ आणि भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते होते. ते इ.स. १९६७च्या लोकसभा निवडणुकीत पंजाब राज्यातील अमृतसर लोकसभा मतदारसंघातून लोकसभेवर निवडून गेले. तसेच ते इ.स. १९७७च्या लोकसभा निवडणुकीत पंजाब राज्यातील गुरुदासपूर लोकसभा मतदारसंघातून लोकसभेवर निवडून गेले. ते इ.स. १९७७ ते इ.स. १९८० या काळात जनता पक्षाचे नेते होते. तसेच इ.स. १९९० ते इ.स. १९९३ या काळात ते ओडिशा राज्याचे राज्यपाल होते.