म.ए.सो. गरवारे वाणिज्य महाविद्यालय

म.ए.सो. गरवारे कॉलेज ऑफ कॉमर्स हे पुण्यातील एक वाणिज्य महाविद्यालय असून याची स्थापना इ.स. १९६७ साली 'म.ए.सो. कॉलेज ऑफ कॉमर्स' या नावाने झाली होती. उद्योगपती श्री. आबासाहेब गरवारे यांच्या गौरवार्थ महाविद्यालयाचे नामकरण १९७१ साली ‘म.ए.सो. गरवारे कॉलेज ऑफ कॉमर्स’ असे झाले. ११वी (कनिष्ठ महाविद्यालय) ते पी.एच.डी. पर्यंतचे शिक्षण येथे दिले जाते. हे महाविद्यालय सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाशी संलग्नित आहे, तसेच विश्वविद्यालय अनुदान आयोग (युजीसी)ची महाविद्यालयाला मान्यता आहे. ‘राष्ट्रीय मूल्यांकन आणि प्रमाणन परिषद’ (नॅक) या राष्ट्रीय पातळीवरील समितीच्या तिसऱ्या फेरीतील पुनर्मूल्यांकनात ०४ पैकी ३.४५ गुणांसह ‘अ’ श्रेणी म.ए.सो. कॉलेज ऑफ कॉमर्सला मिळाली आहे. ग्रंथालय, स्वतंत्र २ अभ्यासिका, संगणक कक्ष व अन्य सर्व सुविधा उपलब्ध असलेल्या २ इमारती महाविद्यालयाच्या आवारात आहेत. तसेच महाविद्यालयाचे वसतिगृह महाविद्यालयाच्याच आवारात आहे.[]

म.ए.सो. गरवारे कॉलेज ऑफ कॉमर्सला विद्यापीठ अनुदान आयोग म्हणजेच युजीसीची मान्यता आहे. []

Teaching-Learning Approach

संपादन
  • प्रकल्पपद्धती
  • केस स्टडी
  • शैक्षणिक सहली
  • क्षेत्र संशोधन (फिल्ड रिसर्च)
  • अन्य तज्ज्ञ व्यक्तींचे मार्गदशन (गेस्ट लेक्चर्स)
  • क्षेत्रभेटी (इंडस्ट्री विजिट्स)
  • प्राणायाम व योगा
  • चर्चासत्रे
  • पीपीटी प्रेझेन्टेशन
  • क्विज
  • संशोधन प्रकल्प
  • नाट्यप्रकल्पांमधून, उपक्रमांमधून शिक्षण
  • टीम वर्क

हे सुद्धा पहा

संपादन
  1. ^ "Affiliated College of Pune University" (PDF).
  2. ^ "Two colleges get top NAAC grade - Times of India". The Times of India. 2017-12-21 रोजी पाहिले.
  3. ^ "affiliation" (PDF). ugc.ac.in. 15 May 2020 रोजी पाहिले.

बाह्य दुवे

संपादन
  • अधिकृत संकेतस्थळ

साचा:Maharashtra-university-stub