मोवाड
मेवाड याच्याशी गल्लत करू नका.
मोवाड हे भारताच्या महाराष्ट्र राज्याच्या नागपूर जिल्ह्याच्या नरखेड तालुक्यातील एक गाव आहे. हे गाव वर्धा नदीच्या तीरावर वसलेले आहे. येथे नगरपालिका आहे. या पूर्वी वर्धा नदीला १९५९,१९६२,१९७९ या साली महापूर आले होते.त्यात या गावालापण त्याचा फटका बसला. परंतु,३० जुलै १९९१ रोजी रात्री वर्धा नदीमुळे त्या गावात आलेल्या महापूराने, सुमारे ६५० एकर शेतीतील माती वहात जाउन ती खरडल्या गेली. तेथील २०४ गावकऱ्यांचा मृत्यु झाला. पुराच्यe पाण्याने मृतदेह वहात जाउन ते २ ते ३ किमी पर्यंत पसरले होते.खरडलेल्या जमिनीत काहीच पिक होत नाही.या गावाचे सुरक्षित जागी पुनर्वसन करण्यात आले आहे.[१]
त्या गावाचे केलेले एक आदर्श पुनर्वसन म्हणून,त्यावेळच्या तहसिलदारास राष्ट्रपती पुरस्काराने सन्मानितही करण्यात आले होते.[ संदर्भ हवा ]