मोर्टिमर व्हीलर

ब्रिटिश सैन्य अधिकारी आणि पुरातत्त्वज्ञ

मोर्टिमर व्हीलर (१० सप्टेंबर १८९० - २२ जुलै १९७६) ब्रिटिश सैन्यातील अधिकारी व पुरातत्त्व होते. त्यांनी वेल्स राष्ट्रीय संग्रहालय आणि लंडन संग्रहालयाचे संचालक, भारतीय पुरातत्त्व सर्वेक्षण विभागाचे महासंचालक आणि संस्थापक, आणि लंडन मध्ये पुरातत्त्व संस्थेचे मानद संचालक म्हणून काम केले. त्यांनी पुरातत्वशास्त्रावर २४ पुस्तके लिहिली.

SIR MORTIMER WHEELER 1890-1976 Archæologist lived here.jpg

सन १९४४ मध्ये ते भारतीय पुरातत्त्व सर्वेक्षण विभागाचे संचालक म्हणुन रुजु झाले. त्यानंतर त्यांनी हडप्पा, अरिकामेडु, आणि ब्रह्मगिरी येथे उत्खनन केले व भारतीय उपखंडात पुरातत्त्व स्थापनेत सुधारणा घडवुन आणल्या.