मोठी सुगरण किंवा शेरू (इंग्लिश:Blackthroated Weaver Bird; हिंदी:सर्बो बया) हा एक आकाराने चिमणीएवढा पक्षी आहे.

मोठी सुगरण

नर: विणीच्या हंगामात या पक्ष्याचा माथा सोनेरी पिवळा असतो. त्याभोवती काड्यांचे कडे व शेष भाग पिवळट कडा असलेला गर्द तपकिरी असून खालील भाग पांढुरका असतो. छातीवर गर्द तपकिरी रंगाचा रुंद पट्टा असतो.

मादी: पाठीवर गर्द तपकिरी तांबूस वर्णाच्या रेघा असतात. तसेच ठळक पिवळी भुवई व कानाभोवती तपकिरी रंग असतो. मानेवर दोन्ही बाजूंना पिवळा पट्टा, हनुवटी आणि कांठावरील भागाचा रंग पिवळट असून त्यावर तपकीरी रेषा असतात. छाती पिवळट, त्यावर काळी तपकिरी झाक व इतर रंग पिवळसर असतो.

वितरण

संपादन

पाकिस्तानात वायव्य सरहद्द प्रांतापासून पूर्वेकडे पंजाब, गंगेचे पठार, बांगलादेश, आसाममणिपूर, सिंध, कच्छ, गुजरात तसेच मुंबई या ठिकाणी आढळतात.

निवासस्थाने

संपादन

देवनळाची बेटे व झिलाणी या ठिकाणी राहतात.

संदर्भ

संपादन
  • पक्षीकोश - मारुती चितमपल्ली