डॉ. मोईन शाकीर राजकीय विचारवंत म्हणून ओळखले जातात.[१] ते औरंगाबादच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात राज्यशास्त्राचे प्राध्यापक होते. कम्युनिस्ट पक्षषाचे ते सक्रिय सदस्य होते. त्यांनी मुसलमानांंतील सुधारणावादी चळवळीत दीर्घकाळ काम केले. भा. ल. भोले, राजेंद्र वोरा,असगरअली इंजिनिअर, प्रा. फकरुद्दीन बेन्नूर यांच्यासोबत त्यांनी महाराष्ट्रभर दौरे केले. भारतीय मुसलमान, खिलाफत चळवळ, महात्मा गांधी, मौलाना आझाद, मुहंमद इकबाल, इस्लाम व भारतातील धार्मिक हिंसाचार या विषयांवर त्यांनी अनेक लेख लिहिले आहेत.[२] प्रा. फकरुद्दीन बेन्नूर यांच्या मते ते केवळ इंग्रजीत लिहीत होते. लिखाणाची ही भाषा त्यांनी ठरवून निवडली होती. इकोनॉमिक पेलिटिकल विकलीमध्ये ते नियमित लिहीत असत. त्यांनी मुस्लिम विषयाच्या अनुषंगाने अनेक पुस्तके लिहिली आहेत. मुस्लिम राजकारणाचे ते अभ्यासक म्हणून देशभरात परिचीत होते. १३ जुलै १९८७ रोजी औरंगाबाद येथे त्यांचे निधन झाले.

प्रकाशित ग्रंथसंपादन करा

  • गांघी, आझाद ॲंड नॅशनलिझम[३]
  • मुस्लिम ॲंड इंडियन नॅशनल कॉंग्रेस (1988)
  • स्टेट ॲंड पॉलिटिक्स कंटेम्परी इंडिया (1986)
  • खिलाफत टू पार्टिशन
  • इस्लाम इन इंडियन पॉलिटिक्स (1983)
  • सेक्युलॅरिझम ऑफ मुस्लिम बिहेविअर (1973)

संदर्भ आणि नोंदीसंपादन करा

  1. ^ https://www.epw.in/journal/1980/26/reviews-uncategorised/nationalism-and-communalism.html. Missing or empty |title= (सहाय्य)
  2. ^ https://www.epw.in/journal/1987/32/roots-specials/moin-shakir-memoriam.html. Missing or empty |title= (सहाय्य)
  3. ^ https://www.amazon.in/Books-Moin-Shakir/s?ie=UTF8&page=1&rh=n%3A976389031%2Cp_27%3AMoin%20Shakir. Missing or empty |title= (सहाय्य)