सम्राट मैजी (नोव्हेंबर ३, इ.स. १८५२ - जुलै ३०, इ.स. १९१२) हा जपानचा १२२वा सम्राट होता.

याचे मूळ नाव मात्सुहितो होते व हा सम्राट कोमेइचा दासीपुत्र होता. मात्सुहितोच्या आईचे नाव नाकायामा योशिको होते.

मात्सुहितो वयाच्या १४व्या वर्षी सम्राटपदी आला. त्याच्या राज्यकालात जपानने मागासलेल्या, ग्रामीण अर्थतंत्रातून यांत्रिकी अर्थतंत्रात प्रवेश केला.

जपानी पद्धतिप्रमाणे मृत्युनंतर मात्सुहितोचे नाव बदलून मैजी ठेवले गेले.

मागील:
कोमेइ
जपानी सम्राट
फेब्रुवारी ३, इ.स. १८६७जुलै ३०, इ.स. १९१२
पुढील:
तैशो