मेलुकोटे
(मेलिकोटे या पानावरून पुनर्निर्देशित)
मेलिकोटे तथा मेलुकोटे दक्षिण भारतातील कर्नाटक राज्याच्या मंड्या जिल्ह्यातील पांडवपुरा तालुक्यातील एक गाव आहे. खडकाळ टेकडीवरील हे गाव कावेरी खोऱ्यात आहे असनू मैसुरुपासून ४१ किमी तर बेंगलुरुपासून १३३ किमी अंतरावर आहे.
येथे चेलुवनारायण स्वामी मंदिर हे विष्णूचे देउळ आहे. या देवळाला वडियार घराण्याचा आश्रय होता. वडियार राजा पहिला राज हा येथे समाधिस्थ झाल्याचा समज आहे. येथील वार्षिक उत्सवासाठी देवाचा मुकुट आणि दागिने आणले जातात.
टेकडीच्या माथ्यावर योगनरसिंहाचे मंदिर शहरात आणखी अनेक देवस्थान आणि तलाव आहेत. मेलुकोटे येथील संस्कृत संशोधन अकादमीमध्ये हजारो वैदिक आणि संस्कृत हस्तलिखिते संग्रहित केलेली आहेत. [१]
संदर्भ
संपादन- ^ "Academy of Sanskrit Research". vedavid.org. ASR Official website. 17 September 2018 रोजी पाहिले.