मेरी पार्कर फॉलेट जन्म.१८६८ मृत्यु: १९३३. मेरी पार्कर फॉलेटचा जन्म अमेरिकेतील बोष्टन शहरात झाला. प्राथमिक शिक्षण थायर अकॅडमीत Thayer Academy झाले. तिची असामान्य प्रतिभा आणि अभ्यासामुळे शिक्षक आणि मित्र प्रभावित झालेले दिसतात. तिने आपले शिक्षण रेडाक्लीफ महाविद्यालय [Radcliffc College] मधे घेतले. १८९०ला शिक्षण संपल्यानंतर तिने सामाजिक जीवनास प्रारंभ केला. १८८९८ला पदवीचे शिक्षण पूर्ण केले. रोवस्बरी डिबेटिंग क्लबची स्थापना केली. १९०९ला महिलांच्या महानगर परिषदेची अध्यक्ष झाली. आपले सामाजिक आणि राजकीय कार्य करतांना बालक झोपडपट्टीतील लोकांकडे अधिक लक्ष पुरवले. बोष्टटन प्लेसमेंट बुरोचे सदस्यही त्या होत्या. औद्योगिक व्यवस्थापनात आपले विशेष योगदान त्यांनी दिले. १९१८ला पहिले New State : Group organisation the soluation of popular Government' या पुस्तकाने तिला व्यापक प्रसिद्धी मिळाली. अनेक शोधनिबंध,पुस्तके,व्याख्यान याच्या माध्यमातून तिचे कार्य चालू राहीले. पहिली महिला प्रशासकीय विचारवंत. प्रखर बुद्धीमत्ता आणि विविध विषयाचा व्यासंग यातून तिचे विचार परिपक्व होत गेले. जिच्या संकल्पनेत सामाजिक प्रगती आणि प्रशासकीय कार्यपद्धती अंतभूत होती. तिने मांडलेले विचार भविष्यात उघडपणे स्पष्ट झाले म्हणूनच तिला 'व्यवस्थापन शास्त्रातील भविष्य विधाती’ ही उपाधी मिळाली. फॉलेट यांनी प्रशासकीय संकल्पना सर्वप्रथम सामाजिक व मानसशास्त्रीय आधार प्रदान करून दिला: परंतु याशिवायही अभ्यासूवृत्ती, मार्मिकता, चिकाटी, स्पष्टीकरणासहीत आपली बाजू मांडण्याची कला आणि इंग्रजी भाषेवरील असामान्य प्रभुत्व हे तिच्या व्यक्तिमत्त्वाचे सुवर्ण पैलू होते. पारंपरिक पुरुषी कार्यक्षेत्रावर अतिक्रमण आणि महिला कार्यक्षेत्र यामुळे त्यांच्या नावाला एक वलय प्राप्त झाले होते परंतु याच कारणामुळे तिच्याकडे दुर्लक्षही झाली. मात्र, तिचे कर्तृत्त्व जाणून घेतल्यास तिची असामान्य प्रतिभा निश्चितच प्रभावित करणारी होती. एक प्रशासकीय विचारवम्त याबरोबरच राजकारणी समाजसेविका व्यवहारवादी मानसशास्त्रज्ञ म्हूणनही तिने आपली ओळख निर्माण केली.[१]

मेरी पार्कर फॉलेट
जन्म: १८१८
बोष्टन
मृत्यू: ८ डिसेंबर १९३३
संघटना: लेखन =

मेरी पार्कर फॉलेटची प्रकाशित पुस्तके

1) The Speaker of the House of Representative-(1909) 2) The New State-(1920) 3) Creative Experience-(1924) 4) Dyanmic Administration (de.)1941 5) Freedon and Co-ordination (de.)(1949)

संदर्भ संपादन करा

  1. ^ प्रशासकीय विचारवंत. (पृ.क्र.१२१) लेखक: शाम शिरसाठ, जितेंद्र वासनिक, भगवानसिंग बैनाडे. प्रकाशक: ज्ञानसमिधा पब्लिशिंग वर्ल्ड. औरंगाबाद.

ठळक मजकूर