ऱ्होड्सचा मेमनन
(मेमनन, ऱ्होड्स या पानावरून पुनर्निर्देशित)
मेमनन (इ.स.पू. ३८० - इ.स.पू. ३३३) हा पर्शियाचा सम्राट दरायस तिसरा याच्या अधिपत्याखाली लढणारा एक मांडलिक राजा होता. महान अलेक्झांडरशी लढताना त्याने आपला पराभव होत असल्याचे दिसताना माघार घेतली व माघार घेताना रस्त्यातील गावे व उपयुक्त संसाधने जाळून टाकली. अलेक्झांडरच्या सैन्याला रसदीचा तुटवडा असल्याचे ठाउक असल्याने मेमननने हा डाव टाकला होता. असे केले असता अलेक्झांडर आपला पिच्छा पुरवण्याचे सोडून सैन्याची तरतूद करण्यात वेळ घालवेल असा मेमननचा अंदाज होता.
अलेक्झांडरने ग्रेनायकसच्या लढाईत याचा पराभव केला. लढाईनंतर मॅसिडोनियाचा सैन्याने मेममनच्या सैनिकांची कत्तल उडवली होती.