मेधा कुलकर्णी या कोथरुडच्या माजी आमदार आहेत. मेधा कुलकर्णी यांची भारतीय जनता पक्षाच्या महिला मोर्चाच्या राष्ट्रीय उपाध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे. कुलकर्णी यांच्या रूपाने पुण्यातील महिलेला पहिल्यांदाच एखाद्या पक्षाच्या राष्ट्रीय उपाध्यक्षपदाची संधी मिळाली आहे. महाराष्ट्रातून महिला मोर्चाच्या कार्यकारिणीवर निवड झालेल्या त्या एकमेव पदाधिकारी आहेत.