इंग्लंडपोर्तुगालने डिसेंबर २७, इ.स. १७०३ रोजी मेथुएनच्या तहावर' लिस्बनमध्ये शिक्का-मोर्तब केले. ईंग्लंडच्या संसदसदस्य जॉन मेथुएनने हा तह लिहील्यामुळे यास मेथुएनचा तह म्हणले जाते.

या तहानुसार ईंग्लंडच्या कापडी मालाला पोर्तुगीज बाजारपेठ खुली झाली व इंग्लिश सरकारने पोर्तुगीज मद्याला प्राधान्य द्यायचे कबुल केले. यामुळे पोर्तुगालच्या मद्योद्योगाला चालना मिळाली.