मेक्सिको राष्ट्रीय क्रिकेट संघ

मेक्सिको राष्ट्रीय क्रिकेट संघ आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये मेक्सिको देशाचे प्रतिनिधित्व करतो. २००४ मध्ये ते आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषद (आयसीसी) चे संलग्न सदस्य बनले[५] आणि २००६ मध्ये कोस्टा रिका विरुद्ध त्यांचे आंतरराष्ट्रीय पदार्पण झाले. संघाने जून २०१० मध्ये आयसीसी अमेरिका चॅम्पियनशिपमध्ये पदार्पण केले आणि २०११ मध्ये कोस्टा रिका येथे आयसीसी अमेरिका विभाग ३ स्पर्धेत भाग घेतला. मेक्सिकोने २०१४ आणि २०१८ मध्ये दक्षिण अमेरिकन चॅम्पियनशिपमध्ये देखील भाग घेतला आहे आणि दोन्ही वेळा जिंकले आहे. २०१७ मध्ये ते सहयोगी सदस्य झाले.[१]

मेक्सिको
टोपणनाव क्रिकेट वूल्चर्स
असोसिएशन मेक्सिको क्रिकेट असोसिएशन
कर्मचारी
कर्णधार तरुण शर्मा
प्रशिक्षक जॉन बोनफिग्लिओ
व्यवस्थापक जॅक लिटल
आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषद
आयसीसी स्थिती सहयोगी सदस्य[१] (२०१७)
आयसीसी प्रदेश अमेरिका
आयसीसी क्रमवारी चालू[२] सगळ्यात उत्तम
टी२०आ---४६ (१-मे-२०२१)
आंतरराष्ट्रीय क्रिकेट
प्रथम आंतरराष्ट्रीय १९ मार्च २००६ वि कोस्टा रिका लेडीविले, बेलीझ येथे
ट्वेन्टी-२० आंतरराष्ट्रीय
पहिली टी२०आ वि. बेलीझचा ध्वज बेलीझ ॲथलेटिक क्लब रिफॉर्म, नौकाल्पन; २५ एप्रिल २०१९
अलीकडील टी२०आ वि. आर्जेन्टिनाचा ध्वज आर्जेन्टिना लिमा क्रिकेट आणि फुटबॉल क्लब, लिमा; ६ ऑक्टोबर २०१९
टी२०आ खेळले जिंकले/हरले
एकूण[३]३/५
(० बरोबरी, ० निकाल नाही)
चालू वर्षी[४]०/०
(० बरोबरी, ० निकाल नाही)

टी२०आ किट

१ जानेवारी २०२३ पर्यंत

एप्रिल २०१८ मध्ये, आयसीसी ने त्याच्या सर्व सदस्यांना पूर्ण ट्वेंटी-२० आंतरराष्ट्रीय (टी२०आ) दर्जा देण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे १ जानेवारी २०१९ नंतर मेक्सिको आणि इतर आयसीसी सदस्यांमध्ये खेळले जाणारे सर्व ट्वेंटी-२० सामने पूर्ण टी२०आ दर्जासाठी पात्र असतील.[६]

संदर्भ संपादन

  1. ^ a b "Ireland and Afghanistan ICC newest full members amid wide-ranging governance reform". आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषद. 22 June 2017. 1 September 2018 रोजी पाहिले.
  2. ^ "ICC Rankings". International Cricket Council.
  3. ^ "T20I matches - Team records". ESPNcricinfo.
  4. ^ "T20I matches - 2023 Team records". ESPNcricinfo.
  5. ^ Mexico at CricketArchive.com
  6. ^ "All T20 matches between ICC members to get international status". International Cricket Council. 26 April 2018. 31 August 2018 रोजी पाहिले.