मॅनॅार म्हणजे सामंतशाही काळातील प्रत्येक सामंताची तटबंदीयुक्त गढी आणि त्या सभोवतालचा प्रदेश होय. मॅनॅारमध्ये सामंताचा प्रासाद, शेतकर्‍यांच्या झोपड्या, चर्च, धान्याची कोठारे आणि त्यांना लागून शेतजमीन असे. संपूर्ण मॅनॅारभोवती तटबंदी असे. मॅनॅारला मध्ययुगीन समाजात महत्त्वाचे स्थान होते. प्रत्येच मॅनॅार हे आर्थिक आणि प्रशासकीय दृष्ट्या स्वायत्त व स्वयंपूर्ण होते. किल्लेवजा मॅनॅारमधील सामंत एखाद्या राजाप्रमाणे राहत. ते आपल्या प्रासादात दरबार भरवत. या दरबारात त्यांचे दुय्यम सामंत व कुळे हजर रहात असत. ते नजराणे देत व मनुष्यबळ पुरवीत. मॅनॅारमध्ये नेहमी उत्सव, समारंभ, खेळांचे सामने व मेजवान्या चालत. याच मॅनॅारमुळे युरोपीय सामंतशाही अधिक बळकट झाली.